Ireland Riots : US नंतर आयर्लंडही पेटले; अवैध स्थलांतरितांविरुद्ध दंगली-जाळपोळ, 35 पोलिस जखमी

Ireland Riots,

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : Ireland Riots उत्तर आयर्लंडमध्ये अवैध स्थलांतरितांविरुद्ध दंगली भडकल्या. स्थानिक संघटनांनी अवैध त्यांच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागाचा निषेध करत रस्त्यावर आंदोलन झाले. बॅलीमेना शहरात गुरुवारी चौथ्या दिवशी हिंसक निदर्शने झाली. जमावाने एका मनोरंजन केंद्रासह २५ हून अधिक दुकाने जाळली. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आणि पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. या हल्ल्यात ३५ हून अधिक पोलिस जखमी झाले आहेत.Ireland Riots

आयर्लंडने ब्रिटनकडून अतिरिक्त पोलिस दलाची मागणी केली आहे. लंडनमधून स्कॉटलंड यार्डचे २०० पोलीस आयर्लंडमधील बॅलीमेना येथे रवाना करण्यात आले. बॅलीमेनाच्या जवळ असलेल्या काउंटी अँटिम टाउनमध्येही गुरुवारी सकाळी अवैध स्थलांतरितांविरोधात निदर्शने झाली, परंतु येथे कट्टरपंथीयांच्या जमावाला पांगवण्यात आले. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.



अवैध प्रवासी मुलावर अल्पवयीनाच्या शोषणाचा आरोप

अलीकडचे प्रकरण रोमानियातील एका बेकायदेशीर स्थलांतरित मुलाशी संबंधित आहे. शनिवारी त्याला एका स्थानिक अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक झाली. बऱ्याच काळापासून अतिरेकी संघटना आयर्लंडमध्ये रोमानियातील बेकायदा स्थलांतरितांविरुद्ध आवाज उठवत आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर जनतेत संताप निर्माण झाला. सोमवारपासूनच बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध निदर्शने सुरू झाली.

युरोप : बेकायदा स्थलांतराला विरोध हा मोठा राजकीय मुद्दा

बेकायदेशीर स्थलांतराला विरोध हा सहा प्रमुख युरोपीय देशांमध्ये एक प्रमुख राजकीय मुद्दा बनला आहे. यामध्ये ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन आणि हाॅलंडचा समावेश आहे. ब्रिटनमध्ये निगेल फॅरेजचा रिफॉर्म यूके पक्ष स्थलांतरविरोधी अजेंडा असलेला सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून उदयास आला. जर्मनीमध्ये एएफडी, फ्रान्समध्ये ले पेनचा राष्ट्रवादी पक्ष, इटलीमध्ये ब्रदर्स आणि स्पेन आणि नेदरलँड्समध्ये ग्वेटचा पक्ष बेकायदा स्थलांतराला विरोध करतात.

घाेषणाबाजी: आयर्लंड फक्त आयरिशांचे, घुसखोरांना हाकला

डब्लिनचे कट्टरपंथी कौन्सिलर मलाची स्टीनसन यांनी हिंसक जमावाचे नेतृत्व केले. जमाव घोषणा देत होता की आयर्लंड फक्त आयरिशांचे आहे. बेकायदा स्थलांतरितांना हाकलून द्या. स्टीनसन यांचा आरोप आहे की आयर्लंड सरकार रोमानियन, पॅलेस्टिनी व अफगाण स्थलांतरितांना वसवत आहे. आयर्लंडमध्ये सध्या सुमारे ३३ हजार बेकायदेशीर स्थलांतरित आहेत, तर २०१७ मध्ये येथे फक्त ७२०० बेकायदेशीर स्थलांतरित होते.

Ireland Riots, Immigrants, Police Injured

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात