ED: सहारा केस मध्ये ईडी की सक्रीय, 1500 करोड रुपये से अधिक की नवीन घरे कुर्क
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Sahara case अंमलबजावणी संचलनालयाने सहरा समूहाविरोधात मनी लाँड्रिंग चौकशी अंतर्गत १५०० कोटी रुपयांहून अधिक किमतीची नवीन मालमत्ता जप्त केली आहे.Sahara case
१६ शहरांमधील एकूण १,०२३ एकर जमीन जप्त करण्याचे आदेश जारी. ईडीने पीएमएलए अंतर्गत सहारा प्राइम सिटी लिमिटेडची १६ शहरांमधील एकूण १,०२३ एकर जमीन जप्त करण्याचा आदेश जारी केला होता. २०१६ च्या सर्कल रेटनुसार या भूखंडांची एकूण किंमत १,५३८ कोटी रुपये आहे.
सहारा संस्थांकडून पाठवलेल्या निधीतून बेनामी व्यवहारांद्वारे हे भूखंड खरेदी करण्यात आल्याचे एजन्सीने म्हटले आहे. हे भूखंड उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये आहेत. लोणावळ्यातील अॅम्बी व्हॅलीमध्ये ७०७ एकर जमीन जप्त करण्यात आली.
गेल्या आठवड्यात, ईडीने महाराष्ट्रातील लोणावळा येथील अॅम्बी व्हॅलीमधील १,४६० कोटी रुपयांची ७०७ एकर जमीन जप्त केली होती. हे मनी लाँड्रिंग प्रकरण विविध राज्य पोलिस विभागांनी दाखल केलेल्या ५०० हून अधिक एफआयआरमधून पुढे आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App