Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतात पंडित जवाहरलाल नेहरूंचे री ब्रॅण्डिंग करून राहुल गांधी अमेरिकेत पोहोचले. तिथे सॅम पित्रोदा यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. हे तेच सॅम पित्रोदा आहेत, जे शीख विरोधी दंगलीमध्ये शिखांचे शिरकाण झाल्याच्या घटनेला “हुआ तो हुआ” असे म्हणाले होते.

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी खासदार संदीप दीक्षित यांना खास मुलाखत देऊन पंडित जवाहरलाल नेहरू यांचे री ब्रॅण्डिंग केले. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी हे राजकारणी आणि आपण स्वतःही राजकारणी नाही. पंडित नेहरूंनी आम्हा सगळ्यांना सत्याचा शोध घेण्याचे शिकवले, असे राहुल गांधी त्या मुलाखतीत म्हणाले. महात्मा गांधींशी संलग्न असणारे सगळे शब्द त्यांनी पंडित नेहरूंना चिटकवले.

त्यानंतर राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले. तिथे ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी बोस्टनच्या लोगन विमानतळावर राहुल गांधींचे जोरदार स्वागत केले यावेळी पित्रोदा यांच्याबरोबर ओव्हरसीज काँग्रेसचे कार्यकर्ते हजर होते.

National herald case मध्ये राहुल गांधी आणि सॅम पित्रोदा यांच्या विरोधात ED ने दिल्लीतल्या राऊज अवेन्यू कोर्टात प्रॉसिक्युशन कंप्लेंट दाखल केली आहे. या दोघांविरुद्ध च्या खटल्याची 25 एप्रिलला सुनावणी होणार असून तत्पूर्वी राहुल गांधींनी संदीप दीक्षित यांना खास मुलाखत देऊन पंडित जवाहरलाल नेहरूंचे री ब्रॅण्डिंग केले आणि त्यानंतर ते अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले.

अमेरिकेत दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये ते ब्राऊन युनिव्हर्सिटीत “लोकशाहीचे संरक्षण” या विषयावर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून अमेरिकन ओव्हरसीज काँग्रेसने अनेक ठिकाणी आयोजित केलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये राहुल गांधी सामील होणार आहेत. या प्रत्येक ठिकाणी ते लोकशाही विषयी भाषण देणार आहेत. सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधींचे स्वागत करणाऱ्या ट्विटमध्ये युवकांचा आणि लोकशाहीचा आवाज ऐकू या, असे लिहिले आहे.

सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांना National herald case मधून वाचवण्यासाठी कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांच्याबरोबर अनेक वकिलांची फौज उभी राहिली आहे.

Rahul Gandhi  received a warm welcome at Boston Logan International Airport, Boston, USA.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात