Rahul Gandhi : दाव्याचा निकाल लागेपर्यंत सावरकरांवर टीका नको, राहुल गांधींना कोर्टाचे निर्देश

Rahul Gandhi

विशेष प्रतिनिधी

पुणे : Rahul Gandhi स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालयात दाखल दाव्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका करू नये, असे स्पष्ट निर्देश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या विशेष न्यायालयाने दिले. या प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच गांधी यांनी एका भाषणात पुन्हा सावरकर यांची बदनामी करणारे वक्तव्य केल्याचे अ‍ॅड. संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर न्यायालयाने गांधी यांचे वकील पवार यांना सूचित करत स्पष्ट निर्देश दिले.Rahul Gandhi

लंडन येथील अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी गांधी यांना न्यायालयात हजर होण्याबाबत विशेष न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार गांधी यांचे वकील अ‍ॅड. मिलिंद पवार १८ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर झाले. या वेळी त्यांनी गांधी हे विद्यमान खासदार व लोकसभेचे विरोधी पक्षनेते नेते आहेत. देशातील विविध निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते देशभर दौऱ्यावर होते. येथील न्यायालयाचे समन्स त्यांना मिळाले आहे. मात्र गांधी दौऱ्यावर असल्याने न्यायालयात हजर राहू शकत नाहीत, असे नमूद करत न्यायालयाकडे अर्ज केला. त्यावर सुनावणी घेऊन दोन डिसेंबरला गांधी यांना न्यायालयात हजर ठेवावे, असा आदेश अ‍ॅड. पवार यांना देत न्यायालयाने खटला सोमवारपर्यंत (दि. २) तहकूब केला होता.



सोमवारी अ‍ॅड. पवार यांनी गांधी हे विद्यमान खासदार व लोकसभेचे विरोधी पक्षनेते नेते आहेत. सध्या लोकसभेचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. अनेक महत्त्वपूर्ण बिले संसदेत चर्चेसाठी येणार आहेत. गांधी हे एका महत्त्वाच्या पदावर असल्याने त्यांनी लोकसभेच्या अधिवेशनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयात गैरहजर राहण्याची परवानगी देण्यासह न्यायालयात उपस्थित राहण्यास मुदतवाढ मिळावी, असा अर्ज न्यायालयात केला होता. तो मान्य करत न्यायालयाने मुदतवाढ दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० जानेवारी २०२५ ला होणार आहे.

‘पुढील तारखेस गैरहजर राहिल्यास शिक्षा करा’

गांधी सोमवारी (२ डिसेंबर) दिलेल्या तारखेला न्यायालयात हजर झाले नाही म्हणून त्यांच्या अजामीनपात्र अटक वॉरंट काढावे, तसेच ते समन्स मिळाल्यानंतरही हजर न झाल्याने त्यांना भारतीय दंड संहितेतील कलम १७४ तरतुदीनुसार त्यांना शिक्षा व्हावी, असा अर्ज सावरकर यांचे वकील अ‍ॅड. संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयात केला आहे. यासह न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करावी, असादेखील अर्ज केला आहे.

Court directs Rahul Gandhi not to criticize Savarkar till the verdict of the case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात