विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपटवीरांची मांदियाळी शिंदेंच्या पाठीशी उभी राहिली!!
याची कहाणी अशी :
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाल्यानंतर राज्य सरकार लगेच स्थापन होणे अपेक्षित असताना त्याला काहीसा वेळ लागला. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी सातारा जिल्ह्यातल्या दरेगावी निघून गेले. त्यामुळे महाराष्ट्रात बातम्यांचे पेव फुटले.
या बातम्यांच्या पेवा मधूनच एकनाथ शिंदे यांच्या बाजूने राजकीय सहानुभूतीची लाट तयार करण्याचा प्रयत्न झाला. ही लाट तयार करण्यामागे महाविकास आघाडीचे नेते पुढे आले. जे नेते विधानसभा निवडणुकीत आपापल्या मतदारसंघात पडले, तेच नेते एकनाथ शिंदेंच्या बाजूने आज उभे राहिले.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एकनाथ शिंदेबाबत वक्तव्य केले. भाजपने 2019 मध्ये जसे उद्धव ठाकरेंना फसविले, तसेच 2024 मध्ये ते एकनाथ शिंदे यांना फसवत आहेत, असा दावा चव्हाणांनी केला. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला लोकसभा निवडणुकीमध्ये 14 खासदार मिळवलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत फक्त 16 आमदार मिळवता आले. त्यात स्वतः पृथ्वीराज चव्हाण कराड उत्तर मधून पडले, पण आता मात्र ते एकनाथ शिंदेंच्या बाजूने लॉबिंग करत उभे राहिले.
Sadabhau Khot सदाभाऊ खोतांचा बाबा आढावांना सवाल- मुस्लिमबहुल भागात महायुतीला कमी मते मिळतात, तिथे EVM मविआसाठीच कसे सेट होते?
भाजपचे नेते तुमची कोंडी करतील, हे मी आधीच एकनाथ शिंदे यांना सांगितले होते, असा दावा परिवर्तन महाशक्ती नावाच्या तिसऱ्या आघाडीचे नेते बच्चू कडू यांनी केला. बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती आणि राजू शेट्टी यांनी एकत्र येऊन विधानसभा निवडणुकीपूर्वी परिवर्तन महाशक्ती नावाची तिसरी आघाडी काढली. पण या आघाडीचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. त्यामध्ये बच्चू कडू यांचा देखील समावेश राहिला. ते अचलपूर मतदारसंघातून भाजपचे नवखे उमेदवार प्रवीण तायडे यांच्याकडून पडले. आता तेच बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले.
विधानसभा निवडणुकीमध्ये आपण का पडलो??, आपल्या पक्षांचे नेमके काय आणि कुठे चुकले??, याचे आत्मपरीक्षण या आपटवीरांनी केले नाही. त्याउलट हे आपटवीर शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले. यातून ते महायुतीमध्ये काड्या घातल्या, हे उघड आहे. पण असल्या काड्यांचा भाजपवर आणि एकनाथ शिंदे यांच्या भवितव्यावर नेमका काय परिणाम होणार??, हे येणारा काळच ठरवेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App