Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांवरील हल्ल्याच्या घटनेवर भाजपचा मोठा दावा!

Arvind Kejriwal

जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा केजरीवाल अशाचप्रकार सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात, असंही म्हटलं आहे


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Arvind Kejriwal  दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील कथित हल्ल्याला नाटक असे संबोधून भारतीय जनता पक्षाने रविवारी म्हटले की, आपचे प्रमुख हेच या घटनाक्रमाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. आम आदमी पक्षाचे (आप) सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शनिवारी केजरीवाल यांच्या पदयात्रेत असताना त्यांच्यावर पाणी फेकण्याचा प्रयत्न करताना एका व्यक्तीला पकडले.Arvind Kejriwal



भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले की, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री बनावट सहानुभूती कार्ड खेळत आहेत. ते म्हणाले, “अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष आहे कारण त्यांनी जनतेला लुटले आणि ‘शीशमहाल’ बांधला. दिल्लीतील लोकांना माहित आहे की आप सरकारच्या जोरावर मते मागू शकत नाही, म्हणून केजरीवाल बनावट सहानुभूती कार्ड खेळत आहेत. ” भंडारी म्हणाले, या कथानकामध्ये लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता तेच आहेत.

भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला म्हणाले की, भाजपनेच नाही तर काँग्रेसनेही प्रश्न उपस्थित केला आहे की, दिल्लीत जेव्हा-जेव्हा निवडणुका येतात तेव्हा अरविंद केजरीवाल असे ‘नाटक’ करतात. ते म्हणाले, “आम्ही नाही, तर काँग्रेसनेही म्हटले आहे की, जेव्हाही दिल्लीत निवडणुका होतात, तेव्हा अरविंद केजरीवाल असे नाटक करतात की कोणी त्यांच्यावर हल्ला करतात, त्यांच्यावर शाई फेकतात. हा सगळा दिखावा.

BJP makes big claim on attack on Arvind Kejriwal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात