नाशिक : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होणे निश्चित झाले असताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अनाठायी तुलना करून मराठी माध्यमांनी सरकार स्थापनेत काड्या घातल्या.
महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांमधील भिन्न राजकीय परिस्थिती आणि नीतीश कुमार आणि एकनाथ शिंदे या राजकीय व्यक्तिमत्त्वांमधील पूर्ण भिन्नता हे दोन मुद्दे बाजूला सारून मराठी माध्यमांनी बिहारमध्ये नितीश कुमार यांना जे जमले, ते महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंना का जमले नाही??, असे सवाल करून सरकार स्थापनेत तर काड्या घातल्याच, पण गेली अडीच वर्षे अत्यंत कार्यक्षमतेने राज्याच्या कारभार सांभाळलेल्या एकनाथ शिंदे यांच्या राजकीय क्षमतेबद्दल शंका व्यक्त केल्या. महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीचे तटस्थ विश्लेषण करण्याचा हा प्रकार नव्हता, तर महायुती सरकारच्या स्थापनेपूर्वी त्यात काड्या सारण्याचाच तो प्रकार होता.
– बिहारमधली रणनीती
वास्तविक नितीश कुमार काय किंवा एकनाथ शिंदे काय दोन्ही नेते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक असताना त्यांना मुख्यमंत्री करणे ही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची विशिष्ट “पोलिटिकल कॅल्क्युलेशन्स” मधून आलेली भूमिका होती. त्यामध्ये केवळ बिहार आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतल्या बहुमताच्या आकडेमोडीचा प्रश्न नव्हता, तर मोदी आणि शाह यांच्या नेतृत्वाखाली देखील भाजप राजकीय दृष्ट्या लवचिक भूमिका घेऊ शकतो आणि मित्र पक्षांना सामावून घेताना सत्तेमध्ये महत्त्वाचा वाटा देऊ शकतो, हे दाखवून द्यायचे होते. त्या दृष्टीने बिहारमध्ये नीतीश कुमार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला मुख्यमंत्रीपदी कायम ठेवणे हा भाजपच्या रणनीतीचा भाग होता, तो त्यांनी तिथे पार पाडला.
– नितीश कुमारांचा राजकीय वारस भाजपच
महाराष्ट्राबाबत मूळातच ती रणनीती भाजपने आखली नव्हती. कारण महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती आणि एकनाथ शिंदे यांची सिनिऑरिटी या दोन पूर्णपणे भिन्न बाबी आहेत. नितीश कुमार यांचे आता वय असे आहे की, त्यांना यापुढच्या राजकीय वाटचालीत बिहारच्या मुख्यमंत्रीपदा शिवाय दुसरे कोणते पद मिळेल ही शक्यताही उरलेली नाही. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींशी त्यांचे असलेले “पॉलिटिकल इक्वेशन” ही त्यांच्यासाठी जमेची बाजू जशी ठरली, तशी बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यानंतर त्यांच्या संयुक्त जनता दलातून तितक्याच जोरकसपणे पुढे येऊन बिहारचे नेतृत्व करणारा नेताच अस्तित्वात नाही, ही भाजपच्या दृष्टीने जमेची बाजू ठरली. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार यांचा राजकीय वारसा आपोआप भाजपच्या नेतृत्वाकडे चालत येणार आहे. म्हणूनच संयुक्त जनता दलापेक्षा जास्त जागा मिळवून देखील भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावर कायम ठेवणे पसंत केले आणि त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात भाजपच्या नेत्यांचे “राजकीय प्रशिक्षण” सुरू ठेवले.
Imtiaz Jalil ईव्हीएमवर निवडणुका घेऊ नका, ताकद कळेल, इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा
महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती मूळातच बिहार पेक्षा भिन्न त्यात भाजपची ताकद बिहार मधल्या भाजप पेक्षा कितीतरी मोठी, नेतृत्व पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यापासून बाकीच्या नेत्यांची मोठी फळी अशा भाजपच्या जमेच्या बाजू असताना निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशानंतर भाजप एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करेल ही सुतराम शक्यताच नव्हती. पण म्हणून एकनाथ शिंदे यांची क्षमता कमी पडली, हे आकलन देखील पूर्ण चुकीचे किंबहुना काही विशिष्ट हेतू मनात ठेवून काढलेला निष्कर्ष ठरले.
– एकनाथ शिंदेंना भविष्यात संधी
शिवाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बळ आणि स्वतः एकनाथ शिंदे यांची ताकद ही वाढतीच आहे. ती कमी करण्याचे भाजपला सध्या तरी कोणतेच कारण नाही. त्याच बरोबर एकनाथ शिंदे यांच्या हाती असलेले वय आणि त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी आवश्यक असलेली क्षमता आणि संधी यांनी नितीश कुमार यांच्यापेक्षा कितीतरी अधिक आहेत. एकनाथ शिंदेंना आत्ता म्हणजे 2024 च्या निवडणुकीनंतर लगेच मुख्यमंत्री केले नाही, म्हणजे त्यांचे “पॉलिटिकल करिअर” संपले किंवा त्यांना “पॉलिटिकल करिअर” मधून “डाउनग्रेड” केले किंवा बाजूला सारले, असा त्याचा बिलकुल अर्थ होऊ शकणार नाही. उलट भाजप एकनाथ शिंदे यांचा राजकीय वापर वेगळ्या पद्धतीने आणि अधिक परिणामकारक पद्धतीने कसा करून घेऊ शकतो हे पाहणे भाजप आणि एकनाथ शिंदे या दोघांच्याही “पॉलिटिकल इक्वेशन” नुसार महत्त्वाचे असणार आहे.
कारण एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना हे महाराष्ट्रात “स्पेंट फोर्स” नाहीत, म्हणजेच खर्च होऊन गेलेली राजकीय शक्ती नसून ती अस्तित्वात असलेली आणि वाढणार असलेली राजकीय शक्ती आहे, याची मराठी माध्यमांना नसली, तरी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला निश्चित जाणीव आहे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्रातले भाजप महायुतीचे “पॉलिटिकल कन्सोलिडेशन” अधिक मजबूत करण्यासाठी त्यांची पावले पडत आहेत, जी मराठी माध्यमाच्या “पवार बुद्धी”च्या आकलनाच्या बाहेरची आहेत!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App