Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला!

Jammu and Kashmir

पुंछमधून IED आणि मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री जप्त


विशेष प्रतिनिधी

जम्मू-काश्मीर : Jammu and Kashmir गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर घाटीत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या एका मोठ्या कटाचा पर्दाफाश केला आहे. वास्तविक, सुरक्षा दलांना पुंछ जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री आणि आयईडी सापडला आहे.Jammu and Kashmir



पूंछ जिल्ह्यात तपास यंत्रणांनी केलेल्या शोध मोहिमेदरम्यान हा स्फोटक पदार्थ सापडला. यामध्ये दोन आयईडी आणि मोठ्या प्रमाणात इतर स्फोटक सामग्रीचा समावेश आहे. यानंतर सुरक्षा दलांनी बॉम्ब निकामी पथकाला पाचारण केले आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि दहशतवाद्यांचा शोध सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील मेंढार येथील छजला पुलाखाली एक संशयास्पद वस्तू दिसल्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला. त्यानंतर बॉम्ब निकामी पथकाने संशयास्पद वस्तूची तपासणी केली असता ती स्फोटक सामग्री असल्याचे निष्पन्न झाले. मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

A major terrorist conspiracy has been foiled in Jammu and Kashmir

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात