नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या लळिताच्या कीर्तनांमधून महायुती आणि महाविकास आघाडी यांची वेगवेगळी आख्याने लागली असताना त्यामधले एक आख्यान लोकसभा निवडणुकीत चाललेला जरांगे फॅक्टर विधानसभा निवडणुकीत का चालला नाही??, हे आहे. त्याची वेगवेगळी कारणे वेगवेगळ्या राजकीय विश्लेषकांनी दिली. तो त्यांच्या त्यांच्या आकलनाचा आणि राजकीय वकुबाचा विषय राहिला. त्यामध्ये कोणाला जरांगे फॅक्टर चालणारच नव्हता, असे वाटले, तर कुणाला जरांगे फॅक्टर मुद्दाम चालवला गेला नाही, असे वाटले. पण हे देखील दोन्ही मुद्दे ज्याच्या त्याच्या राजकीय आकलनाचा विषय होते. Sharad pawar and manoj jarange political similarities
त्या पलीकडे जाऊन मनोज जरांगे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करू नयेत म्हणून कुणी, कसे मॅनेज केले??, याविषयी सामाजिक कार्यकर्ते आणि वकील असीम सरोदे यांनी मध्यंतरी जो खुलासा केला होता, त्यावर मराठी माध्यमांमध्ये सुरुवातीला चर्चा जरूर झाली, पण ती चर्चा नंतर अचानक बंद झाली. कारण त्यामध्ये जरांगेंच्या मास्टर माईंडचा रोल उघड्यावर आला. तो रोल फार पुढे चालू ठेवणे मराठी माध्यमांना शक्य नव्हते. पण म्हणून जरांगे फॅक्टर आणि मास्टर माईंड यांची चर्चा थांबविणे याची बिलकुलच गरज नव्हती.
वास्तविक मनोज जरांगे आणि त्यांचे मास्टर माईंड यांच्या राजकारणामध्ये विलक्षण साम्य असणाऱ्या काही बाबी या निमित्ताने समोर आल्या. जरांगे आणि त्यांचे मास्टर माईंड यांच्या राजकारणाचे धागेदोरे बेमालूमपणे एकमेकांमध्ये गुंफले गेलेत. त्यांचे राजकीय + सामाजिक विचार एकमेकांशी अतिशय संलग्न आहेत, ते सगळ्या महाराष्ट्र समोर आता उघडपणे आले आहेत.
पण त्याचबरोबर मास्टर माईंड आणि मनोज जरांगे यांच्या राजकारण शैलीमध्ये मात्र जे विलक्षण साम्य आहे, ते अद्याप तरी कोणी पुढे आणलेले नाही. ते म्हणजे मास्टर माईंड आणि जरांगे यांचे नेहमीच माध्यमांमध्ये मास्टर स्ट्रोक, पण ऐनवेळी अवसान घातातून बाउंड्रीवर कॅच आऊट!! हे ते साम्य आहे.Sharad pawar
– जरांगेंच्या मास्टर माईंडच्या 60 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक मास्टर स्ट्रोक मारले. अगदी 1980 मध्ये ते सगळ्या विरोधकांचे स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय क्षितिजावर उदयाला आले. सगळ्या विरोधकांचे आशास्थान बनले. देशाच्या पातळीवर ते त्यावेळच्या पुढच्या पिढीचे विरोधकांचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते बनत असतानाच 1986 मध्ये ते काँग्रेसमध्ये शिरले आणि विरोधकांच्या देशव्यापी नेतृत्वाचे हे अवसान पहिल्यांदा बाउंड्रीवर कॅच आऊट झाले. Sharad pawar
Eknath shinde नाराजीच्या माध्यमी चर्चांना एकनाथ शिंदेंचा पूर्णविराम; मोदी + शाह यांचाच निर्णय अंतिम!!
– 1991 मध्ये मास्टर माईंड तर थेट पंतप्रधान पदाच्या खुर्चीला गवसणी घालायला गेले. महाराष्ट्रात तसा त्यांनी तुफानी प्रचार केल्यामुळे त्यांच्या काँग्रेस पक्षाचे तब्बल 36 खासदार निवडून गेले. हे सगळेच्या सगळे खासदार आपल्या पाठीशी नेतृत्व पदासाठी उभे राहतील आणि आपल्याला पंतप्रधान पदाची माळ सहज गळ्यात घालता येईल, असा मास्टर माईंडचा होरा होता, पण त्यांना दिल्लीचा अंदाज आला नाही. त्यांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरण्याचा मास्टर स्ट्रोक मारला खरा, पण 36 पैकी फक्त 6 खासदारांनी पाठिंबा दिल्यामुळे त्या मास्टर स्ट्रोक मधून षटकार जाण्याऐवजी ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत देखील बाउंड्रीवर कॅच आऊट झाले. त्यांना आयत्या वेळी अवसान घात होऊन माघार घ्यावी लागली. त्यावेळी पंतप्रधान पदावर खरे “चाणक्य” विराजमान झाले होते.
– 1999 मध्ये परदेशी मूळ हा मुद्दा काढून मास्टर माईंडने मास्टर स्ट्रोक मारला. पण काँग्रेसवाले असे जबरदस्त फिल्डर की, त्यांनी मास्टर माईंडला ब्राऊन्ड्रीवरच कॅच आऊट करत थेट पक्षाबाहेर काढून टाकले. त्यामुळे त्यांना स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस काढावी लागली. पण महाराष्ट्राच्या सत्तेसाठी पुन्हा परदेशी मूळाचेच पाय धरावे लागले. इथे सुद्धा अवसान घात होऊन मास्टर माईंड बाउंड्रीवरच कॅच आऊट झाले. मास्टर माईंडचे असे बरेच मास्टर स्ट्रोक सांगता येतील.
– जरांगे नवखे, पण पक्के शिष्य
त्यामानाने मनोज जरांगे फारच नवखे खेळाडू ठरले. लोकसभेत आपला फॅक्टर चालल्याबरोबर जरांगे यांनी चार महिन्यांमध्ये अशा काही गर्जना केल्या, की आता जरांगेंनी विधानसभेच्या रणमैदानात उतरवलेले उमेदवार भल्याभल्यांना धोबीपछाड देतात की काय असे वाटायला लागले होते. जरांगेंनी माध्यमांमधून अगदी मास्टर माईंड स्टाईलने मास्टर स्ट्रोक मारले होते. त्यांनी मराठा + मुस्लिम कॉम्बिनेशन जमवून पाहिले. त्यात दलित फॅक्टर मिसळवून पाहिला. त्यामुळे भल्याभल्यांचे धाबे दणाणले. मनोज जरांगे यांच्या मास्टर स्ट्रोक मुळे महायुती डब्यात जाणार अशी अख्ख्या देशात वातावरण निर्मिती झाली, पण अखेर जरांगेंनी आपण शिष्य कोणाचे आहोत हे दाखवून दिले. जरांगे सुद्धा मास्टर स्ट्रोक मारून आवसान घाताने बाउंड्रीवर कॅच आऊट झाले. त्यांनी मास्टर माईंडच्या सूचनेनुसार ऐन वेळेला माघार घेऊन त्यांच्या समर्थकांचा अवसान घात केला. मास्टर माईंडच्या इतर शिष्यांचे वैशिष्ट्य नवख्या मनोज जरांगे यांनी देखील अशा रीतीने “जपले”!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App