सांगत परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेश सरकारला अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची खात्री करण्याचे आवाहन केले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बांगलादेशातील इस्कॉनचे हिंदू धर्मगुरू आणि सनातन जागरण मंचचे प्रवक्ते चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांच्या अटकेवर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही घटना “गंभीर चिंतेची बाब” असल्याचे सांगत परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेश सरकारला अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची खात्री करण्याचे आवाहन केले आहे.
चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना अल्पसंख्याकांच्या हक्कांच्या मागणीसाठी सभेचे नेतृत्व केल्याबद्दल अटक करण्यात आली. त्यांना कोर्टातून जामीनही मिळालेला नाही. बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांवर अतिरेकी घटकांकडून हल्ले, जाळपोळ, लूटमार आणि मंदिरांची तोडफोड अशा घटना सातत्याने समोर येत असताना ही घटना घडली आहे. चिन्मय कृष्ण दास हिंदू अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या आरोपांविरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत.
Adam Master नामुष्कीकारक पराभव जिव्हारी, आडम मास्तरांची राजकारणातून निवृत्ती
परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “बांगलादेशात अल्पसंख्याकांवर हल्ले करणारे गुन्हेगार मोकळेपणाने फिरत असताना, आपल्या समुदायाच्या हक्कांबद्दल शांतपणे बोलणाऱ्या एका धार्मिक नेत्यालाही भारताने दोषी ठरवले आहे.” शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या अल्पसंख्यांकांवर होणारे हल्ले चिंतेचा विषय आहेत. मंत्रालयाने बांगलादेश सरकारला अल्पसंख्याकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण संमेलनाच्या अधिकाराचे संरक्षण सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.
बांगलादेशात शेख हसीना यांची उचलबांगडी झाल्यापासून हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या विरोधात हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मंदिरे आणि पुतळ्यांची तोडफोड करण्यापासून ते व्यावसायिक प्रतिष्ठान आणि घरांची जाळपोळ अशा घटना सामान्य झाल्या आहेत. मानवाधिकार संघटनांच्या मते, प्रशासकीय कृती अनेकदा पक्षपाती आणि निष्काळजीपणाच्या असतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App