विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतरच होईल, अशी स्पष्ट ग्वाही महायुतीतल्या सगळ्या नेत्यांनी दिल्यानंतर देखील निवडणूक निकालानंतर तिसऱ्या दिवशी सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्या यायला सुरुवात झाली. एकनाथ शिंदे यांनी म्हणे, 36 तास भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी मुख्यमंत्री पदाबाबत वाटाघाटी केल्या, पण दिल्लीतून त्यांना निरोप आला आणि त्यानंतर त्यांनी “वर्षा” बंगल्यावरच्या सगळ्या बैठक रद्द केल्या. शिवसेनेच्या निवडून आलेल्यांच्या आमदारांच्या देखील भेटीसाठी घेणे टाळले.
अर्थात सूत्रांच्या हवाल्याने या बातम्या विविध माध्यमांनी चालविल्या. याला खुद्द एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या गोटातल्या कोणीही अधिकृत दुजोरा दिला नाही.
दरम्यानच्या काळात काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खाजगी विवाह समारंभासाठी दिल्लीत पोहोचले. मात्र, माध्यमांनी त्या संदर्भातल्या बातम्या गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करायला फडणवीस दिल्लीत पोहोचल्याच्या दिल्या. अमित शाहांच्या घरापुढे विविध वृत्तवाहिन्यांच्या ओबी वाहिन्या लागल्या होत्या. पण त्यापैकी कोणालाही देवेंद्र फडणवीस तिथे आलेले दिसले नाहीत. मात्र फडणवीस दिल्लीत अमित शहांशी चर्चा करायला आल्याच्या बातम्या पिकल्या.
Modi – Shah – RSS एकजुटीच्या निर्णयाचा महायुतीच्या नेत्यांचा निर्वाळा; पण शिंदे + अजितदादांच्या हट्ट किंवा आग्रहाची मोदी – शाहांपुढे चालेल का मात्रा??
अमित शाह आज मुंबईत येणार आणि सरप्राईज देणार किंवा फडणवीस यांच्याच नावाची घोषणा करणार अशाही बातम्या माध्यमांनी रंगविल्या. मात्र, त्या बातम्यांना अधिकृत सूत्रांनी दुजोरा दिला नव्हता.
दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडू नये. भाजपचा नेतृत्वाने “बिहार पॅटर्न” राबवून त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद ठेवावे वगैरे बातम्या माध्यमांमधून पेरल्या. विविध देवळांमध्ये जाऊन महाआरत्या केल्या. अगदी अजमेर शरीफ दर्ग्यावर चादरी चढविल्या. पण त्यापलीकडे निर्णय प्रक्रियेमध्ये प्रभाव टाकू शकेल, अशी कुठलीही गोष्ट किंवा घटना एकनाथ शिंदे यांच्या गोटातून समोर आली नाही.
मात्र, माध्यमांनी एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या जोरदार चालवून घेतल्या. या निमित्ताने एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याच वळणावर गेले. 2019 सारखा ते पूर्ण वेगळा निर्णय घेणार अशा बातम्यांचे पतंग हवेत उंचावर उडवले गेले. परंतु त्या पतंगांना एकनाथ शिंदे यांच्या “वर्षा” बंगल्यावरून किंवा फडणवीसांच्या “सागर” बंगल्यावरून किंवा अजितदादांच्या “देवगिरी” बंगल्यावरून हवा दिल्याची अधिकृत बातमी कुठलीही माध्यमे देऊ शकतील नाहीत. कारण त्यांचे सोर्सेस तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. जे सोर्सेस पोहोचले, तिथे त्यांना बातम्यांची पाळेमुळे सापडू शकली नाहीत. कारण या बातम्यांची पाळेमूळे दिल्लीत फक्त मोदी आणि शाह यांच्याच घरी रुजली आहेत. तिथे कुणाचेच सोर्सेस पोहोचू शकत नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App