Modi – Shah – RSS एकजुटीच्या निर्णयाचा महायुतीच्या नेत्यांचा निर्वाळा; पण शिंदे + अजितदादांच्या हट्ट किंवा आग्रहाची मोदी – शाहांपुढे चालेल का मात्रा??


नाशिक : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत एकत्र बसून एकजुटीने निर्णय घेऊ, असा महायुतीच्या नेत्यांनी दिला निर्वाळा, पण शिंदे किंवा अजितदादांच्या हट्ट आणि आग्रहाची मोदी – शाहांपुढे चालेल का मात्रा??, हा खरा सवाल आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार??, याची प्रचंड उत्सुकता संपूर्ण देशात निर्माण झाली. यामध्ये माध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रभागी ठेवले. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने नेमके किती प्रबळ मुद्दे आहेत, याचीही मांडणी केली. मधल्या मध्ये अजितदादांना लॉटरी लागू शकेल, अशा बातम्या त्यांच्या राष्ट्रवादीने पेरल्या. त्याही कुठे अधेमध्ये उगवल्या. पण आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ, असा खुलासा अजितदादांनी कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी केला.

दरम्यानच्या काळात माध्यमांनी वेगवेगळी नावे पुढे – मागे सरकवली. मंत्रिमंडळाची यादी आपापल्या वकुबानुसार जाहीर केली. यापैकी कुठल्याही माध्यमांना कुठल्याच बातमीची स्वतःच खात्री नव्हती. त्यामुळे जी काही माहिती बातमी म्हणून सादर केली, ती सूत्रांच्या हवाल्याने त्यांना सादर करावी लागली. जी सूत्रे दिल्लीत मोदी – शाहांपर्यंत पोहोचणे सोडाच, ती शिंदे – फडणवीसांपर्यंत पोहोचण्याची सुद्धा मारामार राहिली.

माध्यमांच्या सगळ्या बातम्यांचे सूर आणि लहेजा हे काँग्रेसी वळणाचेच राहिले. काँग्रेसमध्ये गटबाजी, एकमेकांची नावे कापणे, दुसरी प्यादी पुढे सरकवणे असले प्रकार चालतात. त्याच्या बातम्या माध्यमांमध्ये रंगवून दिल्या जातात. कारण त्या आधीपासून पेरल्या जातात. तसलाच प्रकार माध्यमांनी भाजप महायुतीच्या बाबतीत करून पाहिला. म्हणूनच अजितदादांचे नाव लॉटरी रूपाने माध्यमांनी समोर आणले.

पण या सगळ्यांमध्ये महायुतीच्या नेत्यांनी आम्ही एकत्र बसून मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊ, असा स्पष्ट शब्दांमध्ये निर्वाळा दिला. यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल वगैरे नेत्यांचा समावेश होता. प्रफुल्ल पटेल यांनी संसद भवनाच्या दारातच महायुतीत मुख्यमंत्री पदाबाबत कुठलेही मतभेद नसल्याचा निर्वाळा दिला.

देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने भाजपमध्ये एकमत होऊन त्याचा दबाव भाजप श्रेष्ठींवर वाढत असल्याच्या बातम्या इंग्रजी माध्यमांनी देखील दिल्या.

पण “हट्ट”, “आग्रह”, “दबाव”, “गटबाजी”, प्यादे – मोहरे पुढे – मागे सरकवणे हे शब्द तरी मोदी शाह यांच्यापुढे चालतात का?? एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांची मोदी आणि शाहांपुढे बोलण्याची ताकद तरी आहे का??, त्यांनी एखादे नाव मनात ठरविले असेल, तर ते जाहीर करण्यापासून महाराष्ट्रातले कुठले नेते त्याला अडकाठी घालू शकतात का??, तेवढी त्यांची क्षमता तरी आहे का??, हे खरे सवाल आहेत. याविषयी माध्यमांच्या कुठल्याच सूत्रांनी चकार शब्द काढला नाही. त्यामुळे माध्यमांना त्याच्या बातम्याही करता आल्या नाहीत.

संघाचा “इनपूट” महत्त्वाचा

एकनाथ शिंदे किंवा अजित पवार हे त्यांच्या “टर्म्स अँड कंडिशन्स” नुसार भाजपच्या महायुतीत आलेले किंवा टिकून राहिलेले नाहीत ते भाजपच्या “टर्म्स अँड कंडिशन्स” नुसार महायुतीमध्ये आले आणि सध्या टिकून राहिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच काय, पण बाकीचे अख्खे मंत्रिमंडळ आणि इतर महत्त्वाच्या पदांवरची नावे, जी मोदी – शाहांच्या मनात असतील, ती तशीच्या तशी अंमलात आणावी लागतील. यामध्ये संघाचा “इनपूट” सर्वांत महत्त्वाचा ठरेल. तो शिंदे किंवा अजितदादांच्या तथाकथित हट्ट किंवा आग्रहापेक्षा जास्त महत्त्वाचा असेल, हे सांगायला “पवार बुद्धी”च्या माध्यमांसाठी अवघड असले, तरी तटस्थ राजकीय निरीक्षक आणि विश्लेषकांसाठी बिलकूल अवघड नाही.

Modi – Shah – RSS determined factors than Shinde and ajit pawar in maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात