Devendra Fadnavis फडणवीसांचा एक आडाखा परफेक्ट ठरला; जातीपातीच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राने नेता स्वीकारला!!


नाशिक : महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागताच महायुतीत जल्लोष आणि महाविकास आघाडी सन्नाटा पसरला, तरी देखील शरद पवारांनी कराडमध्ये जाऊन आपण पुन्हा मैदानात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर मराठी माध्यमांमध्ये पवारांच्या पक्षाच्या भवितव्याची चर्चा सुरू केली.

पण महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या सगळ्या गदारोळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या अनेक मुलाखतींमधून जो आडाखा मांडला होता, त्याकडे क्वचितच कुठल्या मराठी माध्यमाचे लक्ष गेले. देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुलाखतींमधून स्पष्ट सांगितले होते, की माझी ब्राह्मण जात ही फक्त महाराष्ट्रातल्या काही नेत्यांच्या मनात आहे. महाराष्ट्राच्या जनतेने जातीपाती पलीकडे जाऊन मला माझ्या गुणदोषांसकट स्वीकारले आहे. त्यामुळे मला महाराष्ट्रात राहून राजकारण करायची भीती वाटत नाही!!

देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला हा आडाखा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या कसोटीवर आणि महाराष्ट्राच्या कौलाच्या कसोटीवर 100 % उतरला. देवेंद्र फडणवीस यांच्या या राजकीय आकलनाविषयी आणि अडाख्याविषयी मराठी माध्यमांनी त्यांना हवी तशी दाद दिली नाही. पण म्हणून फडणवीसांचा बरोबर आलेल्या आडाख्याची किंमत काही कमी होत नाही. उलट महाराष्ट्राने देवेंद्र फडणवीस यांसारख्या सक्षम – कार्यक्षम नेत्याला जातीपातीच्या पलीकडे जाऊन स्वीकारल्याचे सत्य समोर आले आहे.


Nana Patole विधानसभेतील पराभवावर चिंतन करू, जनतेच्या प्रश्नांसाठी यापुढेही काम करू, नाना पटोलेंची प्रतिक्रिया


महाराष्ट्रातच काय परंतु देशाच्या राजकारणात “जात फॅक्टर” महत्त्वाचा आहे, हा काही कोणी “जावईशोध” लावण्याची गरज नाही, पण केवळ जात हाच फॅक्टर महत्त्वाचा आहे आणि बाकीचे कुठलेही फॅक्टर त्याच्यापुढे दुय्यम ठरतात म्हणून केवळ जातीच्या आधारावरच राजकारण करावे आणि पुढे मागे सरकत राहावे, असला प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत कधी संभवत नव्हता. किंवा ते ज्या संघ परिवारातून येतात, तिथे देखील हा प्रकार खपवून घेतला गेला नसता. अर्थातच फडणवीस यांनी केवळ जात फॅक्टर वर अवलंबून राहून स्वतःचे किंवा पक्षाचे राजकारण केले नाही.

जात वर्चस्वाचा अजेंड्यावर मात

महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये संघ आणि त्याच्याशी संलग्न संघटना उतरल्या, त्याला कारण काही केवळ देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व “एस्टॅब्लिश” करायचे हा नव्हता, तर त्या पलीकडे जाऊन निवडणुकीतल्या जनमताच्या कौलाच्या आधारे महाराष्ट्राच्या मूळ उदारमतवादी, पण कणखर राजकीय संस्कृतीला न्याय देण्याचे ते काम होते. एखाद्या निवडणुकीमध्ये भाजप किंवा फडणवीसांची हार झाली असती, तर फारसे बिघडले नसते. पण हिंदुत्वाच्या एकजिनसी आणि समरसतेच्या अजेंड्यावर जाती वर्चस्वाच्या हिंदू समाज तोडणाऱ्या अजेंड्याने मात केली, असा नॅरेटिव्ह तयार होणे संघ परिवाराला किंबहुना संपूर्ण हिंदू समाजालाच मान्य नव्हते. म्हणून संघ परिवार खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणमैदानात विचारपूर्वक उतरला होता. महाराष्ट्राच्या लढाईत संघ विचार यशस्वी ठरला.

इथे फडणवीस यांची अनावश्यक भलामण करण्याचे कारण नाही. पण त्यांच्याकडे भाजपच्या नेतृत्वाने महाराष्ट्राचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने सर्वसमावेशकता आत्मसात करून महाराष्ट्राच्या राजकारणाचे आकलन करवून घेतले आणि ते प्रत्यक्ष अंमलात आणून दाखविले, त्याबद्दल त्यांना डिस्टिंक्शनचे गुण दिलेच पाहिजेत. अन्यथा त्यांच्यासारख्या ब्राह्मण नेत्याने मराठा आरक्षणासारखा अत्यंत संवेदनशील मुद्दा तितक्याच संवेदनशीलतेने हाताळलाच नसता. हा मुद्दा हाताळताना फडणवीसांनी दाखविलेला राजकीय संयम देखील वाखाणण्याजोगाच ठरला, हे मान्य करावे लागेल.

मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिले म्हणून ते आरक्षण आम्ही मान्य करणार नाही, अशी दर्पयुक्त भूमिका ज्यांनी घेतली, त्यांना महाराष्ट्राच्या कौलाने जबरदस्त चपराक हाणली. यात कुठल्याही स्वयंघोषित पुरोगामी नेत्यांना देखील महाराष्ट्रातल्या मतदारांनी सोडले नाही, ही बाब येथे अधोरेखित करावी लागेल!!

Maharashtra accepts Devendra Fadnavis as a leader, beyond casteist agenda

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात