Uddhav Thackeray उद्धव ठाकरे म्हणाले- हा अनपेक्षित निकाल, जनतेने कोणत्या रागातून महायुतीला मते दिली कळत नाही!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील निकाल हा अनपेक्षीत आणि अनाकलनीय असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. या निकालाची अपेक्षाच नव्हती. ही लाट नाही तर त्सुनामीच असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. ज्यांनी ज्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला, त्या सर्वांचे मी आभार मानत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील एकूण आकडेवारी पाहिल्यानंतर या सरकारला एखादा बिल अधिवेशनात मंजुरीसाठी मांडण्याची आवश्यकताच नसल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षाच ठेवायचा नाही, असे चित्र भाजपने महाराष्ट्रात ठेवले असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.

काही महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एकच पार्टी ठेवायचे, असे म्हटले होते. त्यानुसार राज्यात ‘वन नेशन वन इलेक्शन’ बरोबरच ‘वन पार्टी’ देखील करायचे आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. जनतेने महायुतीला मतदान का केले? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. राज्यात सोयाबीनला भाव मिळत नाही, म्हणून महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला मते दिली का? की इतर कोणत्या रागापोटी मते दिली, हे कळत नाही. या मागचे गुपित काही दिवसांनी शोधावे लागेल, असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

काही लोक म्हणतात की, इव्हीएमचा विजय आहे, असूही शकतो. मात्र महाराष्ट्रातील जनतेला हा विजय मान्य असेल तर कोणीच काही बोलण्याची आवश्यकता नाही. मात्र मान्य नसेल तर त्यांना महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू, असा हे आम्हाला सांगायचे असल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.


Jharkhand झारखंडमध्ये सत्तेत भाजप परतणार की सोरेन सरकार कायम राहणार?


आता तरी अस्सल भाजपचा कोणीतरी मुख्यमंत्री व्हावा

राज्यात सोयाबीनला भाव नाही, कापूस खरेदी होत नाही, शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज वाढले आहे, बेरोजगारी वाढली आहे, महिला सुरक्षित नाहीत, महागाई वाढली आहे, असे सर्व प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहिणीच्या योजनेवर हा विजय मिळवला असल्याच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वाढती महागाईची शाबासकी म्हणून या सरकारला मते दिलेत का? असे देखील ठाकरे यांनी म्हटले आहे. हा टोपणा नाही मात्र यावेळी तरी अस्सल भाजपचा कोणीतरी मुख्यमंत्री होईल, अशी अपेक्षा किंवा आशा असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र माझ्याशी असे वागेल?

महायुतीचा विजय झाला आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो आणि आता ते लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यायला सुरुवात करतील आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करतील, अशी अपेक्षा असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. कुटुंब प्रमुखाप्रमाणे माझ्याशी वागणारा महाराष्ट्र माझ्याशी असे वागेल? यावर माझा विश्वास नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे यामध्ये नक्की काहीतरी गडबड असल्याचा दावा देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

चार महिन्यात युतीने काय दिवे लावले?

लोकसभा निवडणुकीमध्ये लागलेला निकाल चार महिन्यात कसा बदलू शकतो? असा प्रश्न पडतो. चार महिन्यांमध्ये असे महायुती सरकारने कोणते दिवे लावले? की त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाले, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. आमच्या झालेल्या सर्व सभांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती तर मोदी आणि शहा यांच्या सभेमध्ये खुर्च्या रिकाम्या होत्या, असा आरोप देखील ठाकरे यांनी केला आहे.

Uddhav Thackeray said- This is an unexpected result, I don’t know why the people voted for the Mahayuti!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात