अकरा जण बचावले; दोघांचा शोध सुरू आहे.
विशेष प्रतिनिधी
पाटणा : Indian Navy गोव्याच्या वायव्येकडील समुद्रात भारतीय नौदलाच्या पाणबुडीचा अपघात झाला. भारतीय नौदलाच्या पाणबुडीची मार्थोमा या भारतीय मासेमारी जहाजाशी टक्कर झाल्याचे सांगण्यात येत आहे.Indian Navy
मिळालेल्या माहितीनुसार, मासेमारीच्या जहाजावर 13 जणांचा ताफा होता. भारतीय नौदलाने 11 जणांची सुखरूप सुटका केली आहे. इतर दोन जणांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेनंतर संरक्षण मंत्रालयाकडून (एमओडी) निवेदनही समोर आले आहे.
21 नोव्हेंबर 2024 रोजी गोवा किनाऱ्याच्या वायव्येला सुमारे 70 नॉटिकल मैल अंतरावर भारतीय नौदलाच्या पाणबुडी पीएम 21 शी टक्कर झालेल्या मार्थोमा या भारतीय जहाजाच्या दोन क्रू सदस्यांसाठी बचावकार्य सुरू आहे, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. प्रयत्नांना चालना देण्यासाठी तटरक्षक दलासह अतिरिक्त संसाधने या भागात पाठवण्यात आल्याचे पुढे सांगण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App