आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेवर जगाचे लक्ष असते.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेवर जगाचे लक्ष असते. ईव्हीएममुळे आपल्या देशात ज्या वेगाने मतदान आणि मतमोजणी होते ते पाहून विकसित देशांनाही आश्चर्य वाटते. अमेरिकेत नुकत्याच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीचा निकाल लागण्यास अनेक दिवस लागले. कॅलिफोर्नियामध्ये अजूनही मतमोजणी सुरू आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मालक एलोन मस्क यांनी भारताच्या निवडणूक प्रक्रियेवर भाष्य केले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची भारतातील लोकसभा निवडणुकीशी तुलना करताना ते म्हणाले की, भारताने एका दिवसात 640 दशलक्ष म्हणजेच 64 कोटी मतांची मोजणी केली, मात्र कॅलिफोर्निया, अमेरिकेत मतमोजणी अजूनही सुरू आहे.
त्यांनी X सोशल मीडिया हँडलवर लिहिले, ‘भारताने एका दिवसात 640 दशलक्ष मतांची मोजणी केली आहे, तर कॅलिफोर्निया अजूनही मतांची मोजणी करत आहे.’
अमेरिकेत ५-६ नोव्हेंबरला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीनंतर लगेचच मतमोजणी सुरू झाली, मात्र कॅलिफोर्नियामध्ये अजूनही मतमोजणी सुरू आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत बॅलेट पेपरद्वारे मतदान केले जाते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App