विशेष प्रतिनिधी
मुंबई : मित्र पक्षांनाच पोखरून स्वतःची ताकद वाढवायच्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीची राजकीय चालबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तोंडी कराडमध्ये बाहेर आली. अजितदादांनी पुतण्याला वाचवण्यासाठी कर्जत जामखेड मध्ये सभा घेतली नाही, याची कबुली त्यांनी स्वतःच दिली. यावर कर्जत जामखेड चे भाजपचे उमेदवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी कठोर शब्दांचा प्रहार केला. पवार कुटुंबीयांमध्ये अलिखित करार झाला होता. त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. त्याचा मी बळी ठरलो. महायुतीच्या नेत्यांनी याची गंभीर दखल घ्यावी, असा इशारा राम शिंदे यांनी दिला. Ajit Pawar and Rohit pawar game of Ram shide
रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात अजित पवारांनी जाणीवपूर्वक सभा घेतली नव्हती. शहाण्या तू थोडक्यात वाचलास. मी सभा घेतली असती, तर तुझे काय झाले असते??, असे उद्गार अजितदादांच्या तोंडून आज कराडमध्ये यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी रोहित पवारांच्या समोरच बाहेर आले. यातून अजितदादांची चालबाजी संपूर्ण महाराष्ट्रासमोर उघड झाली.
Devendra Fadnavis फडणवीसांचा एक आडाखा परफेक्ट ठरला; जातीपातीच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राने नेता स्वीकारला!!
या मुद्द्यावरून राम शिंदे यांनी पवार कुटुंबीयांना घेरले. पवार कुटुंबीयांमध्ये अलिखित करार झाला होता. रोहित पवारांनी बारामतीत येऊ नये. अजित पवार कर्जत जामखेड मध्ये येणार नाहीत, हा तो करार होता. रोहित पवारांनी बारामतीत जाऊन मतदानाचा हक्क देखील बजावला नाही. पवारांच्या या कौटुंबिक राजकारणाचा मी बळी ठरलो. अजितदादांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. मी फेरमतमोजणी साठी अर्ज केला, तो देखील त्यावेळी स्वीकारला नाही. महायुतीच्या नेत्यांनी याची गंभीर दखल घ्यावी. अजितदादांच्या तोंडूनच सत्य बाहेर आल्यानंतर मी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार आहे, असे राम शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App