विशेष प्रतिनिधी
नागपूर : Devendra Fadnavis आमच्या महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, असे म्हणत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर भाष्य केले आहे. नागपूर येथे पत्रकारांशी देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून पुढील वाटचाल ठरवली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. Devendra Fadnavis
फडणवीस म्हणाले, शिंदे साहेब असतील, पवार साहेब असतील निश्चितपणे आम्ही सगळे एकत्रितच आहोत. आमच्या महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. आम्ही निवडणुकीच्या पूर्वीदेखील सांगितले होते की सगळे निर्णय सोबत बसून होतील. आमचे श्रेष्ठी असतील ते आमच्यासोबत बसून सगळे निर्णय घेतील. त्यामुळे मला असे वाटते की कोणाच्या मनात किंतु- परंतु असेल तर आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तोदेखील दूर केला आहे. Devendra Fadnavis
Eknath shinde नाराजीच्या माध्यमी चर्चांना एकनाथ शिंदेंचा पूर्णविराम; मोदी + शाह यांचाच निर्णय अंतिम!!
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल. तिन्ही पक्ष मिळून मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय लवकरच घेतील. आम्ही सगळे पक्षश्रेष्ठींशी चर्चा करत आहोत. लवकरच आपल्याला याचे उत्तर मिळेल. आधी मुख्यमंत्री ठरेल आणि मुख्यमंत्री ठरल्यानंतर ते मंत्रिपदे कोणाला द्यायची हे ठरवतील. त्यामुळे मला असे वाटते की, आधी मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी. त्यानंतर मंत्र्यांचीदेखील जी नावे आहेत, ती लक्षात येतील. पुढची प्रक्रिया कशी असणार आहे, असा प्रश्न विचारला असता त्यावर फडणवीस म्हणाले, या संदर्भात आमची श्रेष्ठींसोबत बैठक होईल.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्रिपदावरील दावादेखील त्यांनी सोडला असल्याचे स्पष्ट झाले आहे. अडीच वर्ष त्यांनी पाठिंबा दिला आहे, असे शिंदे म्हणाले. तसेच उद्या दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 30 किंवा 1 तारखेला शपथविधी होऊ शकतो, असे अजित पवारांनी सांगितले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App