या प्रकरणांमध्ये 13 नोव्हेंबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Manipur violence नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने मणिपूर हिंसाचाराच्या अलीकडील घटनांशी संबंधित तीन प्रमुख प्रकरणांचा तपास सुरू केला आहे. परिस्थितीचे गांभीर्य आणि काही मोठे कट असण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकरणांचा तपास एनआयएकडे सोपवला होता.Manipur violence
एनआयएने तपास सुरू केला असून घटनास्थळी भेट दिली आहे. या प्रकरणांमध्ये 13 नोव्हेंबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. पहिली घटना बोरोब्रेका पोलीस स्टेशन परिसरातील आहे, जिथे 11 नोव्हेंबर रोजी अनेक घरांना आग लागली होती. यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर अज्ञात दहशतवाद्यांनी तीन महिला आणि तीन मुलांसह सहा जणांचे अपहरण करून त्यांची हत्या केली.
दुसरे प्रकरण जाकुराधोर करोंगचे आहे, जिथे 11 नोव्हेंबर रोजी सीआरपीएफच्या चौकीवर हल्ला झाला होता. यामध्ये एका कॉन्स्टेबलला गोळी लागली असून, त्याच्यावर सिलचरमध्ये उपचार सुरू आहेत. शोध मोहिमेदरम्यान, सुरक्षा दलांनी घटनास्थळापासून काही अंतरावर शस्त्रांसह अज्ञात दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App