विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर: Imtiaz Jalil एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ईव्हीएमच्या वापराबाबत तसेच राज्य सरकारच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी भाजपवर निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार केल्याचा आरोप करत मतदारांचा विश्वास गमावल्याचा दावा केला. Imtiaz Jalil
इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या पूर्व मतदारसंघातील भाजप उमेदवार अतुल सावे यांच्यावर निवडणुकीत पैसे वाटपाचा आरोप केला होता. त्यावर प्रशासनाने तीन सदस्यीय समिती नेमली होती. समितीने अहवाल तयार केला असला तरी तो अद्याप सार्वजनिक झालेला नाही. हा निकाल लवकर लागला पाहिजे, अन्यथा गैरप्रकारातून सरकार स्थापन होईल,” असे जलील म्हणाले. ईव्हीएमवरून लोकांचा विश्वास उडाल्याचा दावा करत जलील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ईव्हीएमवर खूप प्रेम आहे, पण लोकांना ते नको आहे. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, तुमची ताकद कळेल.”
ईव्हीएमच्या माध्यमातून अनेक संशयास्पद निकाल आल्याचेही त्यांनी नमूद केले.
जलील यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप करत म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टरद्वारे पैसे आणले. हे पैसे गावागावात वाटण्यात आले, आणि आम्ही याचे पुरावे दिले आहेत.”
Vijay Wadettiwar : विदर्भाचे लेकरू म्हणत विजय वडेट्टीवार यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने
त्यांनी प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप करत पैशांच्या वाटपाचे पुरावे सीसीटीव्ही फुटेजद्वारे सिद्ध होऊ शकतील, असे सांगितले.
देशातील लोकशाही हळूहळू संपत चालल्याचा इशारा देत जलील म्हणाले की, देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे. निवडणूक यंत्रणा हीच सर्वात मोठी समस्या आहे. त्यांनी भाजपवर मुस्लिम आणि दलित भागांमध्ये पैसे वाटल्याचा आरोप करत स्थानिक अधिकाऱ्यांवरही निष्क्रियतेचा ठपका ठेवला.
इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर पक्षपाती असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांकडून निष्पक्षतेची अपेक्षा करू शकत नाही,” असे ते म्हणाले. आंबेडकर नगरमधील पैसे वाटप प्रकरणावर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला.
सरकारने या आरोपांची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी करत जलील यांनी ईव्हीएमविरहित निवडणुकीसाठी आवाहन केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App