Pawar and Thackeray : बाबांचे उपोषण तीन दिवसांत मागे; पवार + ठाकरेंना शोधावे लागणार “नवे जरांगे”!!

नाशिक : महायुतीला पाशवी बहुमत मिळाल्याने लोकशाही टिकणार नाही, इथून पुढे कुठलीही निवडणूक EVMs नकोच, ती बॅलेट पेपरवरच हवी, मुंबई अदानींना आंदण देऊ नये, जनतेला फुकट काही वाटू नये, वगैरे मुद्द्यांवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्याच्या महात्मा फुले वाड्यात सुरू केलेले उपोषण उद्धव ठाकरेंच्या शब्दाखातर तीन दिवसांनी मागे घेतले… आणि बाबा आढावांचे “मनोज जरांगे” होता होता वाचले!! Pawar and thackeray needs new manoj jarange to carry forward agitation against EVMs

वास्तविक बाबा आढाव जुने समाजवादी विचारांचे कार्यकर्ते. त्यांच्या प्रामाणिक भूमिकेविषयी शंका किंवा संशय बाळगायचे कारण नाही. कारण त्यांचा सेवाभाव अनुभवणारे हजारो लोक आजही पुण्यात भेटतील. बाबांनी हमालांसाठी केलेली चळवळ असो, अथवा रिक्षा पंचायतीचे सारखी चळवळ असो, त्यांनी नि:स्वार्थीपणे त्या चळवळी चालविल्या आणि यशस्वी करून दाखविल्या. बाबांच्या समाजवादी निष्ठांविषयी देखील संशय घेण्याचे कारण नाही.


Imtiaz Jalil ईव्हीएमवर निवडणुका घेऊ नका, ताकद कळेल, इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा


पण गेल्या काही वर्षांमध्ये बाबा वयानुसार थोडे पडद्याआड गेले होते. पण उपोषणाच्या निमित्ताने ते पुन्हा प्रकाशात आले. त्यांच्या उपोषणामुळे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना अचानक एक “राजकीय प्रोग्रॅम” गवसला होता आणि ते बाबांना भेटण्यासाठी थेट उपोषण स्थळी दाखल झाले होते.

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीचे खापर पवार + ठाकरे आणि काँग्रेसने EVMs फोडले खरे, पण त्यांच्या महाविकास आघाडीने राजकीय विश्वासार्हता पूर्णपणे गमावल्याने EVMs विरोधातले आंदोलन चालवायचे कसे त्यासाठी जनतेचा पाठिंबा मिळवून उठाव करायचा कसा??, हा त्यांच्यासमोर सवालच होता. मनोज जरांगे यांच्यासारख्या व्यक्तीला उकसवून मोठे आरक्षण आंदोलन उभे केले. त्यासाठी करोडो रुपयांचा खर्च केला, पण त्याचा राजकीय उपयोग काही झाला नाही. उलट झाला, तो तोटाच झाला. हा अनुभव अवघ्या आठवड्यापूर्वी घेऊन बसलेले पवार आणि ठाकरे विशेषतः पवार “नव्या मनोज जरांगेंच्या” शोधातच होते. बाबा आढावांच्या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांच्या हाती “नवे मनोज जरांगे” लागतच होते. कारण शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्या राजकीय विश्वासार्हतेचा प्रश्न असला किंबहुना त्यांची राजकीय विश्वासार्हता पूर्णपणे संपुष्टात आली असली, तरी बाबा आढावांच्या बाबतीत तसे नव्हते. त्यांच्या राजकीय विश्वासार्हता विषयी सर्वसामान्यांच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाचा राजकीय लाभ उठवण्याच्या इराद्यानेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकाच दिवशी येऊन त्यांना भेटले. पण उद्धव ठाकरेंच्या विनंतीला मान देऊन बाबांनी तिसऱ्या दिवशी उपोषण मागे घेतले. ते त्यांच्या 94 वर्षांच्या वयाला साजेसेस ठरले.

पण आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना “नवे मनोज” जरांगे शोधावे लागणार अशी स्थिती या निमित्ताने येऊन ठेपली आहे. कारण EVMs विरोधातले जनतेचे आंदोलन दीर्घकाळ चालवायचे असेल, तर एखाद्या “तगडाच” आंदोलनकर्ता शोधावा लागेल, जो उपोषण किंवा धरणे आंदोलनामध्ये जास्त दिवस “दम” धरून “टिकेल” आणि त्याच्या भोवती लोकं गोळा होऊ शकतील!!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता, शरद पवार किंवा उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांना ना मनोज जरांगे उपयोगी पडले, ना निर्भय बनो आंदोलनवाले उपयोगी ठरले, बाबांचे उपोषण तर तीन दिवसांमध्येच आटोपले. त्यामुळे आता “नवे मनोज जरांगे” शोधणे ठाकरे + पवारांना भाग आहे.

Pawar and thackeray needs new manoj jarange to carry forward agitation against EVMs

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात