विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे “तब्बल” 10 आमदार निवडून आल्यानंतर वस्तादाने अखेर डाव टाकलाच. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधली भाकरी फिरवून टाकली. त्यांनी नवोदित आमदारांना महाराष्ट्र विधानसभेत काम करायची मोठी संधी दिली, पण ती सत्ताधारी बाकांवरची नव्हे, तर विरोधी बाकांवरची!!
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये झाली. त्या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि विधानसभा निवडणुकीत नव्याने निवडून आलेले 10 आमदार उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल साधक बाधक चर्चा झाली.
Pawar and Thackeray : बाबांचे उपोषण तीन दिवसांत मागे; पवार + ठाकरेंना शोधावे लागणार “नवे जरांगे”!!
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधली भाकरी फिरवत नवोदित आमदारांवर महत्वपूर्ण जबाबदाऱ्या टाकल्या. अर्थात त्या सत्ताधारी बाकांवरच्या नव्हे, तर विरोधी बाकांवरच्या जबाबदाऱ्या टाकल्या. पवारांनी जितेंद्र आव्हाडांना विधानसभा गटनेतेपदी नेमले. आर. आर आबांचे चिरंजीव रोहित पाटलांना विधिमंडळ मुख्य पक्ष प्रतोदपदी नेमले, तर उत्तम जानकरांना विधानसभा प्रतोद पदी नेमले. यातले रोहित पाटील आणि उत्तम जानकर पहिल्यांदाच विधानसभेत आमदार बनले आहेत.
निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मधून मुख्यमंत्री पदाच्या नावाचा प्रश्न आला, तेव्हा पवारांनी यापैकी कोणाचेही नाव घेतले नव्हते. त्यावेळी त्यांनी “मनातले नाव” देखील सांगितले नव्हते, पण उघडपणे जयंत पाटलांचे नाव घेतले होते. जयंत पाटलांना निवडणुकीनंतर मोठी जबाबदारी देता येऊ शकते, असे वक्तव्य पवारांनी केले होते.
पण विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 10 आमदार निवडून आल्यानंतर मात्र पवारांना पक्षांतर्गत भाकरी फिरवण्याची संधी मिळाली आणि त्यांनी अचूक टायमिंग साधत ती साधली. वस्तादाने डाव टाकून नवोदित आमदारांना विधिमंडळात काम करण्याची मोठी संधी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App