विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असताना शरद पवारांनी आपल्या आमदार आणि खासदारांना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठींसाठी पाठविले. तशा बातम्या मराठी माध्यमांमध्ये आल्या. त्यामुळे आकड्याचा तळ गाठून देखील पवारांची सत्तेची खुमखुमी अजून गेली नाही का??, असा सवाल तयार झाला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि आता त्यांनीच विधानसभेत नेमलेले गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची “वर्षा” बंगल्यावर जाऊन दोन दिवसांपूर्वीच भेट घेतली होती. जितेंद्र आव्हाड यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ दरेगावी दोन दिवसांसाठी निघून गेले होते. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांना एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी का पाठवले??, पवारांचा कुठला “मेसेज” घेऊन आव्हाड शिंदेंना भेटले का??, वगैरे बातम्यांचे त्यावेळी पेव फुटले होते. मात्र प्रत्यक्षात त्या बातम्यांमधून काहीही निष्पन्न झाले नाही.
Sadabhau Khot सदाभाऊ खोतांचा बाबा आढावांना सवाल- मुस्लिमबहुल भागात महायुतीला कमी मते मिळतात, तिथे EVM मविआसाठीच कसे सेट होते?
आज शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भिवंडीचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी “सागर” बंगल्यावर पाठविले. या भेटीच्याही आधीच्या स्वरूपाच्या बातम्या आल्या. शरद पवार आपल्या आमदार – खासदारांमार्फत शिंदे फडणवीसांकडे कुठली राजकीय चाचपणी करत आहेत का??, असा सवाल माध्यमांमधून विचारला गेला, पण या सगळ्यातून महत्त्वाचा सवाल तयार झाला, तो म्हणजे पवारांची सत्तेची खुमखुमी अजून गेली नाही का??
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत आकड्यांचा तळ गाठला. त्यांचे फक्त 10 आमदार निवडून आले. पवारांच्या अख्ख्या राजकीय कारकीर्दीत एवढे कमी आमदार कधीच निवडून आले नव्हते. याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेने शरद पवारांचे नेतृत्व पूर्ण झुगारून लावले, पण तरी देखील सत्तेची खुमखुमी न गेल्यामुळे पवारांनी आपले आमदार खासदार शिंदे – फडणवीसांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांकडे चाचपणीसाठी पाठविले, असाच निष्कर्ष अनेकांनी काढला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App