विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला कौल देऊन जनतेने दाखवली सत्तेची दिशा; पण मनोज जरांगे यांनी त्यानंतर देखील वापरली सरकारच्या मुंडक्यावर पाय द्यायची भाषा!! Manoj Jarange about bjp win in election
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला जनतेने मोठा कौल दिला. 288 पैकी तब्बल 235 जागा दिल्या. मनोज जरांगे आणि त्यांच्या मास्टर माईंडच्या सगळ्या खेळ्या महाराष्ट्राच्या जनतेने उद्ध्वस्त केल्या. ओबीसींमध्ये घुसून मराठा समाजाला आरक्षण घेण्याचा मनोज जरांगे यांचा हट्ट लाडक्या बहीणींच्या कौलाने मोडून काढला. कारण भाजप महायुतीने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे समर्थन केले, पण ते स्वतंत्र आरक्षण देण्याचे समर्थन ठरले.
Pawar and Thackeray : बाबांचे उपोषण तीन दिवसांत मागे; पवार + ठाकरेंना शोधावे लागणार “नवे जरांगे”!!
एवढे होऊन देखील मनोज जरांगे यांची मस्ती उतरली नाही. त्यांनी तुळजापूर मधून नव्या सरकारच्या मुंडक्यावर पाय द्यायची भाषा करून मराठा समाजाला आरक्षण खेचून आणायची दमबाजी केली. सरकार कोणाचेही येऊ द्यात. मराठ्यांना काही देणे घेणे नाही. मराठा समाज संघर्ष करून ओबीसी मधून आरक्षण घेईलच. त्यासाठी सरकारच्या मुंडक्यावर पाय देईल, अशी उर्मट भाषा जरांगे यांनी वापरली.
आता प्रचंड जनमताच्या कौलासह सत्तेवर बसणारे नवे सरकार मनोज जरांगे यांच्या संदर्भात नेमकी किती आणि कशी कठोर भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App