ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी नुकतीच विराट कोहलीची भेट घेतली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Australian बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये 10 दिवसांचे अंतर आहे. दरम्यान, भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियन पीएम इलेव्हनशी झाला. जो गुलाबी चेंडूचा सराव सामना होता. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी दोन्ही संघांची वैयक्तिक भेट घेतली. या भेटीनंतर एका मुलाखतीत अँथनी अल्बानीजन यांनी विराट कोहलीच्या फॅन फॉलोइंगबद्दल मोठा खुलासा केला. त्याने सांगितले की, त्यांचे वैयक्तिक डॉक्टर विराट कोहलीचे मोठे चाहते आहेत.Australian
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी नुकतीच विराट कोहलीची भेट घेतली आणि त्यादरम्यान त्यांनी कोहलीबद्दल त्यांच्या आणि त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांचा किती आदर आहे हे उघड केले. अल्बानीजने सांगितले की त्यांचे डॉक्टर विराट कोहलीचे मोठे चाहते आहेत आणि त्यांनी विराटचा ऑटोग्राफ मागितला होता. अल्बनीजने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, “विराट कोहलीबद्दल माझ्या वैयक्तिक डॉक्टरांची आवड शब्दांच्या पलीकडे आहे. जेव्हा मी विराटला भेटणार असल्याचे सांगितले तेव्हा त्यांना विश्वास बसला नाही आणि मला कोहलीचा ऑटोग्राफ घेण्यास सांगितले.”
पर्थ कसोटीत विराट कोहलीने शानदार खेळी केली. त्याने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियात 7वे शतक झळकावले. विराट कोहलीने 143 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या आणि टीम इंडियाला 295 धावांनी विजय मिळवून दिला. पण विराट कोहली भारत विरुद्ध पीएम इलेव्हन गुलाबी चेंडूच्या सराव सामन्यापासून दूर राहिला. कोहली क्षेत्ररक्षण किंवा फलंदाजी करताना दिसला नाही. विराट कोहलीला PM XI विरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. तर त्याच्या जागी कर्णधार रोहित शर्माने फलंदाजी केली.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडमध्ये होणार आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना आहे, जो गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे. दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App