विशेष प्रतिनिधी
नागपूर : नागपूर दौऱ्यात संजय राऊत यांनी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांची भेट घेतली. ऑर्थर राेड जेलमधील आठवणींना उजाळा दिला. किती कठीण काळ साेबत घालविला हे सांगितले. मात्र, आता राऊत आणि देशमुख यांची भेट वादाच्या भाेवऱ्यात सापडली आहे. राऊत आणि देशमुख यांच्यासाेबत गाैतम भटकर हा कुख्यात गुंड जेवण करत असल्याचे फाेटाे त्यांनी समाज माध्यमांवर शेअर केले आहेत.
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी हे फाेटाे शेअर करताना म्हटले आहे की, हे आहेत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्राचा भोंगा संज्या (संजय राऊत). दोघेही बेलवर म्हणजे जामीनावर बाहेर आहेत. नागपुरात जेवणाचा आनंद घेत आहेत. हरकत नाही.
Kolkata rape : मृत्यूपूर्वी पीडितेला दिल्या जखमा, बलात्काराची पुष्टी, पण फ्रॅक्चर नाही; कोलकाता घटनेचा तपशीलवार पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर
पण बेलवरचे हे दोन्ही आरोपी कुणासोबत जेवतात तेही पहा. गौतम भटकर सोबत आहे.हा भटकर कुख्यात संतोष आंबेकर टोळीचा म्होरक्या. या भटकरवर मोक्का सुद्धा लागला, बलात्कार केला आणि त्याच तरुणीसोबत लग्न करून सुटला. खंडणीचे तर कित्येक गुन्हे त्याच्यावर आहेत. आता अशा गुन्हेगारांसोबत रहाल तर जेलमध्ये जावेच लागणार.
मग भाषणात कशाला सांगता नागपूरच्या माणसामुळे आम्हाला जेलमध्ये जावे लागले! जैसी करनी वैसी भरनी!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App