विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येवरून देशभरात खळबळ उडाली आहे. डॉक्टरांसोबत घडलेल्या या घृणास्पद घटनेनंतर देशभरातून निषेध व्यक्त होत आहे. Sukanta Majumdar Agitation will continue to demand Mamatas resignation
आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील बलात्कार-हत्येच्या घटनेवर केंद्रीय मंत्री सुकांता मजुमदार म्हणाले की, भाजप आंदोलन सुरूच ठेवेल. उद्या, भाजप महिला मोर्चाच्या नेतृत्वाखाली कोलकात्यात 15 प्रमुख ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी रक्षाबंधनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ते म्हणाले की आमचे आमदार 20 ऑगस्टला आंदोलन करणार आहेत.
CM Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगींनी तब्बल 125 व्यांदा काशी विश्वनाथाच्या दरबारात लावली हजेरी!
21 ऑगस्टला आमचे खासदार आंदोलन करतील. 22 ऑगस्टलाही आंदोलन सुरू राहणार असून त्या दिवशी आम्ही आरोग्य भवनाचा घेराव करू. 23 ऑगस्टला आमचा महिला मोर्चा आंदोलन करणार आहे. ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे.
सुकांता मजुमदार म्हणाले, सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची दखल घेतल्याचे मी स्वागत करतो आणि मला पूर्ण विश्वास आहे की न्यायालय या प्रकरणात न्याय देईल आणि दोषीला शिक्षा होईल. तसेच कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. मंगळवारी, सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सकाळी या प्रकरणाची पहिली सुनावणी होईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App