नाशिक : शरद पवारांबाबत अजितदादा आता फारच सॉफ्ट झालेत. त्यामुळेच ते पुन्हा काकांच्या पुठ्ठ्या शिरणार का??, त्या पलीकडे जाऊन हे दोघेही वेगवेगळे लढले, तरी दोन्ही राष्ट्रवादी नंतर एकत्र येऊन आमदारांचा ट्रिपल डिजिट गाठतील का??, अजितदादा सत्तेची वळचण बदलण्याच्या बेतात आहेत का??, असे सवाल तयार झाले आहेत. Ajit pawar very soft on sharad pawar
दोनच दिवसांपूर्वी अजितदादांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांना बारामतीत उतरवणे हे चूक होती, याची कबुली दिली. घरातच राजकारण आणि निवडणुकीची लढाई करायला नको होती, असे ते म्हणाले. त्यानंतर आज एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अजितदादांनी बरीच गूढ विधाने केली. पवारांच्या पक्षात परत जाणार का??, काका – पुतणे एक होणार का??, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी “नो कॉमेंट्स” एवढेच उत्तर दिले. त्यामुळे महाराष्ट्रभर अजित पवारांच्या राजकीय खेळीची चर्चा सुरू झाली.
त्याआधी अजितदारांनी बारामतीतला आपला रस काढून घेतला सात-आठ वेळा आमदार झाल्यानंतर आपल्याला बारामतीतून निवडणूक लढवण्यात आता रस उरला नाही, असे ते म्हणाले. त्या पाठोपाठ रोहित पवारांनी अजितदादा आपल्या विरोधात कर्जत – जामखेड मतदारसंघात येतील असे राजकीय “भाकीत” करून टाकले.
पण एकूण आज दिवसभर अजितदादा जास्त चर्चेत राहिले. या चर्चेच्या बातम्यांमध्ये अधून मधून मुख्यमंत्री आणि अजितदादा यांच्यात फायलींवर सही करण्यावरून वाजल्याच्या बातम्या समोर आल्या, पण त्या खोट्या असल्याचे स्वतः अजितदादांनी सांगितले. बाकी मुख्यमंत्रीपदासाठी नशीब लागते आपल्यापेक्षा ज्युनिअर नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पृथ्वीराज चव्हाण दिल्लीतून येऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे तर आमदार नसतानाही मुख्यमंत्री झाले, पण आपण मागे राहिलो, असे अजितदादा म्हणाले. पण अशी खंत अजितदादांनी अनेकदा व्यक्त केली आहे. त्यात नवीन काही नाही.
Narendra Modi : विकसित भारताचा संकल्प ते वैद्यकीय शिक्षणाच्या वाढीव 75000 जागा; लाल किल्ल्यावरून काय म्हणाले मोदी??; वाचा!!
पवारांवर फारच सॉफ्ट
पण अजितदारांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीची मात्र गंभीर चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली. कारण अजितदादा या मुलाखतीत पवारांवर फारच सॉफ्ट बोलले. पवारांवर पंतप्रधान मोदींनी टीका केली. त्यांना भटकती आत्मा म्हणाले. याविषयी त्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली, पण पवारांवर कोणी बोलले की वाईट वाटते. महाराष्ट्रातल्या लोकांनाही ते नको आहे. कारण महाराष्ट्रातली जनता पवारांना मोठा नेता मानते. ज्येष्ठ नेता मानते. त्यामुळे आम्ही सगळे त्यांचा आदर करतो, असे अजितदादा म्हणाले. त्यावरच तुम्ही पुन्हा शरद पवारांच्या पक्षात जाणार का??, असा प्रश्न विचारल्याबरोबर त्यांनी :नो कॉमेंट्स” एवढेच उत्तर दिले. त्यामुळेच अजितदारांच्या एकूणच राजकीय भूमिकेविषयी महाराष्ट्रात दाट संशय तयार झाला.
अजितदादा महायुतीकडून लढणार आणि जेवढे आमदार निवडून येतील ते घेऊन पुन्हा शरद पवारांच्या सत्तेच्या वळचणीला निघून जाणार, हा मुख्य संशय महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात फिरू लागला.
तसाही 2019 च्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हा प्रयोग करून पाहिलाच होता. तो अडीच वर्षे यशस्वी झाला. मोदींच्या नावावर मते मिळवून शिवसेनेचे खासदार आणि आमदार निवडून आणून भाजपला गंडवून उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी पवारांच्या वळचणीला गेले. पवारांनी काँग्रेसलाही सत्तेच्या वळचणीला आणून बसवले. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि महायुतीत निवडणूक लढवून पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनून देखील भाजपला विरोधी पक्षात जाऊन बसणे भाग पडले. भाजपच्या “मुत्सद्दी” राजकारणाचा तो पराभव होता.
पण “ठाकरे – पवार प्रयोग” अडीच वर्षेच टिकला. त्यानंतर “फडणवीस – शिंदे प्रयोग” सुरू झाला, पण या प्रयोगात फडणवीसांनी अजितदादांना ओढले. अजितदादाही सत्तेच्या वळचणीला येऊन बसले. त्यांनी काकांशी भांडण काढले. पण त्या भांडणाचा लोकसभा निवडणुकीत अजितदादांचा पक्ष किंवा महायुतीला काही फायदा झाला नाही. उलट तोटा झाला. त्यामुळे महायुतीची सत्तेची वळचण काहीशी ढिल्ली झाली. हेच पाहून अजितदादांनी आता भूमिका बदलली नाही ना?? पवारांविषयी ते जास्त सॉफ्ट होत चालले नाहीत ना?? असा दाट संशय महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात फिरू लागला आहे.
महायुती बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस ठेवून अजितदादा कदाचित निवडणूक लढवतील देखील, जेवढे आमदार निवडून आणता येतील तेवढे आणतील. महायुतीची सत्ता टिकली, तर याच सत्तेच्या वळचणीला राहतील, पण जर पवार – ठाकरे आणि काँग्रेस यांना सत्ता अनुकूल असेल, तर अजितदादा आपल्या हातात असलेले आमदार घेऊन त्यांच्या सत्तेच्या वळचणीला निघून जातील, हा संशय अजितदादांच्या मुलाखतीतून ठळकपणे समोर आला आहे. किंबहुना त्या वर्तुळात त्याबद्दल खात्री व्यक्त करण्यात येत आहे.
निवडणूक लढताना वजाबाकी, पण झाल्यावर मात्र बेरीज!!
इतकेच काय, पण महाविकास आघाडी कडून शरद पवारांची राष्ट्रवादी आणि महायुतीकडून अजितदादांची राष्ट्रवादी निवडणुका लढवतील आणि निवडणुका झाल्यानंतर आपापल्या आमदारांची बेरीज करून तिचा ट्रिपल डिजिट गाठून मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकतील, असाही दाट संशय समोर येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more