हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला शोक Rakesh Pal passed away in Chennai
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राकेश पाल यांनी गेल्या वर्षी 19 जुलै रोजी भारतीय तटरक्षक दलाचे 25 वे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला होता. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना चेन्नई येथील रुग्णालयात नेण्यात आले. “कोस्ट गार्ड महासंचालकांचे चेन्नईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
रविवारीच ते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. ज्यामध्ये संरक्षणमंत्र्यांनी नवीन प्रकल्पांचे उद्घाटन केले होते. राकेश पाल यांच्या निधनावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.
Indian Army : भारतीय लष्कराने इतिहास रचला, 15 हजार फूट उंचीवर जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल बनवले
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर लिहिले की, “भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांच्या चेन्नईत आज झालेल्या अकाली निधनाने खूप दुःख झाले. ते एक सक्षम आणि वचनबद्ध अधिकारी होते ज्यांच्या नेतृत्वाखाली ICG ने भारताच्या सागरी क्षेत्राला बळकट करण्यासाठी मोठी प्रगती केली. त्यांच्या कुटुंबासाठी माझ्या संवेदना.
यासोबतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी भारतीय तटरक्षक दलाचे डीजी राकेश पाल यांना श्रद्धांजली वाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या चेन्नईत आहेत. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते चेन्नईला पोहोचले होते. जिथे रविवारी त्यांनी अनेक नवीन प्रकल्पांचे उद्घाटन केले. याच कार्यक्रमात तटरक्षक दलाचे डीटी राकेश पाल देखील सहभागी झाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App