‘’… तेव्हा ‘उबाठा’ला एवढी का मिरची झोंबते?’’ आशिष शेलारांचा सवाल!

Ashish Shelar

‘’या स्टम्प घेऊन, आम्ही पण तयार आहोत!’’  असंही म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

मुंबई  :   भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्य्यावरून तसेच मनसे  नेते संदीप देशपांडे यांना झालेल्या मारहाणीच्याही मुद्य्यावरून निशाणा साधला आहे.  BJP MLA Ashish Shelar criticized Uddhav Thackeray on the issue of corruption in Mumbai Municipal Corporation

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.  शिवाय शिंदे-फडणवीस सरकारने १२०० कोटी रुपयांच्या बीएमसीतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती केली आहे. दिवसांपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर एका अज्ञाताने हल्ला केला होता. कारण, संदीप देशपांडे हे मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार काढणार असल्याचे आणि त्याचा ठोस पुरावा असल्याचंही त्यांनी स्वत: जाहीर केलं होतं. यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाल्याचे मनसेचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी  म्हटले आहे की, ‘’मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला की उबाठाला एवढी का मिरची झोंबते?  मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करता? किती स्टम्प आणि बॅट तुमच्याकडे आहेत?  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारच मानायला हवेत, त्यांनी चौकशी लावून तुमचे “कटकमिशनचे उद्योग मुंबईकरांसमोर उघडे पाडायचे ठरवलेय! तेव्हा तर दीड कोटी मुंबईकरसुद्धा तुम्हाला हिशेब विचारणार आहेत, तेवढे स्टंप आणि बॅट आहेत का तुमच्याकडे?’’

याबरोबर ‘’आम्ही तर रोज विचारणार..कोविड मध्ये “कफना”त पण “कट कमिशन कोणी खाल्ले? औषधांवरची मलाई कुणी खाल्ली? रस्त्यावरचे डांबर, नाल्यातील गाळ, शाळेतील मुलांच्या वस्तू यामध्ये कोट्यवधी कुणी लाटले? या स्टंप घेऊन आम्ही पण तयार आहोत!!’’ असंही शेलार म्हणाले आहेत.

BJP MLA Ashish Shelar criticized Uddhav Thackeray on the issue of corruption in Mumbai Municipal Corporation

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात