विकास कामे स्थगितीच्या मुद्द्यावर अजितदादा आक्रमक; तुमच्याकडूनच शिकलो, फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर

प्रतिनिधी

मुंबई : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून सत्ताधारी आणि विरोध पक्षांनी एकमेकांविरोधात विधान भवनाच्या पाय-यांवर घोषणाबाजी केली. Ajit Dada aggressive on the issue of suspension of development works

विधासभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विकासकामांच्या स्थगितीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी सभागृहात गदारोळ झाला. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी सरकारला जाब विचारला.

राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी अजित पवार यावेळी आक्रमक झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तितकेच प्रतिआक्रमक होत अजितदादांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.



फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर 

यावेळी अजित पवारांना उत्तर देताना, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले. फडणवीस म्हणाले की, तुम्ही 7 वेळा निवडून आला आहात. आम्ही कमी वेळा निवडून आलो आहोत. पण काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो. ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली सरकार आले आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा आमची सगळी विकासकामे रोखण्याचे काम तुम्ही केले होते.

माझ्या स्वत:च्या मतदारसंघातली, सगळ्यांच्या मतदार संघातली कामे तुम्ही रोखली. 2.5 वर्षे तुम्ही भाजपच्या लोकांना एक नवा पैसा दिला नाही. पण आम्ही बदल्याची भावना न ठेवता, विकास कामांमधील 70 % स्थगित्या उचलल्या. तुम्ही जरी आमच्यावर अन्याय केला असला तरी आम्ही करणार नाही, असे सडेतोड उत्तर फडणवीसांनी दिले. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

Ajit Dada aggressive on the issue of suspension of development works

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात