विशेष प्रतिनिधी
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर घाबरलेले कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जुगाड केला. एकाला गावगुंड मोदी म्हणून समोर उभे केले. पण पत्रकारांच्या प्रश्नाने या कथित गावगुंड मोदीची चांगलीच बोबडी वळली.Nana Patole struggles to escape arrest,
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वक्तव्य केले होते की, ‘मी मोदीला मारूही शकतो व शिव्याही देऊ शकतो.’ भारतीय जनता पक्षाने त्यानंतर नाना पटोले यांच्याविरुध्द आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर उपरती होऊन पटोले यांनी तात्काळ आपल्या या वक्तव्याबाबत घुमजाव करत ‘मी देशाचे पंतप्रधानांविषयी नाही तर मोदी नावाच्या गावगुंडाविषयी बोलत होतो.’ असे स्पष्ट केले होते.
त्यानंतर आता तो मोदी नावाचा गावगुंड पोलिसांना सापडला असून पोलिसांनी त्याची चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. नागपूरमध्ये एका वकिलाने उमेश घरडे या व्यक्तीला प्रसारमाध्यमांसमोर सादर केले. नाना पटोले ज्या मोदीला उद्देशून बोलले हेते. तो हाच मोदी आहे, असा दावा त्यांनी केला.
नाना पटोले जे बोलले ते मलाच बोलले. माझ्यावर काही गुन्हे दाखल आहेत. मात्र मी घाबरलो होतो. त्यामुळे पुढे आलो नव्हतो, असे तो कथित मोदी म्हणाला. पत्रकारांनी त्या गावगुंड मोदीला प्रश्न विचारला असता त्याची बोबडी वळली. तो व्यवस्थित उत्तर देऊ शकला नाही.
नाना पटोले यांनी सांगितल्याप्रमाणे प्रचाराला केव्हा आले होते? असा प्रश्न त्या मोदीला विचारण्यात आला. त्यावर मोदी काहीच उत्तर देऊ शकला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App