उत्तरेकडील शीत लहरीचा रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्तर भारतात वाढत्या थंडीचा प्रभाव रेल्वे गाड्याच्या वेळापत्रकावर पडला आहे.कमी दृश्यमानतेमुळे अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. उत्तर रेल्वेकडून शुक्रवारी मिळालेल्या माहितीनूसार धुक्यामुळे दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या २१ गाड्या उशिराने धावत आहेत.सुपर फास्ट तसेच प्रीमियम ट्रेनच्या वेळेवर देखील धुक्याचा प्रभाव दिसून येत आहे. Cold wave in the north affects train schedules

धुक्यामुळे दृश्यमानता अधिक कमी झाली तर गाड्यांना अजून विलंब होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. राजधानी दिल्लीतील वायु गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) अत्यंत खराब श्रेणीत ३५३ नोंदवण्यात आला.


भारतीय रेल्वे सेवेसाठी सदैव तत्पर, २३ मिनिटांत बाळाला उपलब्ध करून दिले गाईचे दूध


ओडिशा ते नवी दिल्ली पुरूषोत्तम एक्सप्रेस (१२८०१), गया ते नवी दिल्ली महाबोधी एक्सप्रेस (१२३९७) शुक्रवारी तब्बल तास उशिराने धावत आहे. दरभंगा-मुजफ्फरपूर-नवी दिल्ली बिहार संपर्क क्रांती एक्सप्रेस (१२५६५) १ तास उशिराने धावत आहे. हावडा धनबाद तसेच गया होत नवी दिल्लीला येणाऱ्या पुर्वा एक्सप्रेस जवळपास दोन तास उशिराने धावत आहे. यासोबतच ०२५६३ क्लोन स्पेशन एक्सप्रेस देखील उशिराने पोहोचली.

बिहारवरून येणाऱ्या संपूर्ण क्रांती एक्सप्रेस (१२३९३), प्रयागराज हमसफर एक्सप्रेस (१२२७५), शिवगंगा एक्सप्रेस (१२५५९), रीवा एक्सप्रेस (१२४२७), श्रमजीवी एक्सप्रेस उशिराने धावत आहेत.तर,गोरखधाम एक्सप्रेस (१२५५५), कैफियत एक्सप्रेस (१२२२५) रद्द करण्यात आले आहे.जबलपुर एक्सप्रेस (२२१८१), मालवा एक्सप्रेस (१२९१९), यूपी संर्पक क्रांती एक्सप्रेस (१२४४७) तसेच शान-ए-भोपाल एक्सप्रेस (१२१५५) जवळपास दोन तासांहून अधिक उशिराने धावत होत्या.

Cold wave in the north affects train schedules

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात