या प्रकरणी पोलीस तक्रार झाल्यावर हा बेकायदेशीर गर्भपात ३० हजार रूपये घेऊन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.Eleven skulls and 52 bones of infants were found at Arvi’s Kadam Hospital in Wardha district
विशेष प्रतिनिधी
वर्धा : वर्धा जिल्ह्यात आर्वीच्या कदम हॉस्पिटल परिसरात अर्भकांच्या ११ कवट्या आणि ५२ हाडं आढळली आहेत.दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.ही खड्ड्यात सापडलेली अर्भकांची हाडं आणि कवट्या पुढील तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठवली आहेत.
कवटया आणि हाडे नेमके कुणाचे आहेत याबद्दल पोलीस तपास करत आहेत.आर्वीचे उपविभागीय पोलीस अधिकारी साळूंके म्हणाले की सापडलेल्या अवशेषाबाबत आताच निश्चित काही सांगता येणार नाही. प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतरच ठोस निष्कर्ष काढता येईल.
दरम्यान प्रयोगशाळेच्या अहवालानंतर सखोल चौकशी करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी आरोपी डॉ. रेखा कदमला अटक केली आहे.तसेच डॉ.कदम यांच्या सासूलाही ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलीस तक्रार झाल्यावर हा बेकायदेशीर गर्भपात ३० हजार रूपये घेऊन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
डॉ. रेखा कदम यांचीही कसून चौकशी सुरू आहे.या हॉस्पिटलला अधिकृत गर्भपात व गर्भनिदान केंद्राचा दर्जा आहे. मात्र, मृत अर्भकाची विल्हेवाट लावण्याची वैद्यकीय पध्दत असते. ती या दवाखान्यात पाळली की नाही याबाबत पोलीस साशंक आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App