“नाय वरण-भात लोंचा कोन नाय कोंचा” ट्रेलर तसेच चित्रपटावर बंदीची भारतीय स्त्री शक्ती संघटनेची मागणी

प्रतिनिधी

मुंबई : दिग्दर्शक महेश मांजरेकर, एन. एच . स्टुडिओ, नाईनटी नाईन प्रोडक्शन यांच्या १४ जानेवारी २०२२ ला प्रदर्शित होणार्‍या ‘ “नाय वरण-भात लोंचा कोन नाय कोंचा” या चित्रपटावर व त्याच्या ट्रेलरवर बंदी घालण्याची मागणी भारतीय स्त्री शक्ती संघटनेने केली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अतिशय टोकाची हिंसा, आक्षेपार्ह दृश्यं, भाषा बाल कलाकारांच्या तोंडी असल्याने दिसून येत आहे.Ban Mahesh Manjrekar film waran bhat loncha non nay koncha

‘पॉक्सो कलम १३’ , भारतीय दंड संहिता कलम २९२ व महिलांचे विभत्स प्रदर्शन कायदा कलम २ (c) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा, असे भारतीय स्त्रीशक्तीच्या महाराष्ट्र् राज्याच्या अध्यक्ष हर्षदा पुरेकर व मुंबई शाखा अध्यक्ष व महाराष्ट्र उपाध्यक्ष सीमा देशपांडे यांनी सादर केलेल्या तक्रारपत्रात म्हटले आहे.“नाय वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा”चै ट्रेलर मागील दोन दिवसांपासून यूट्युबवर पाहायला मिळत आहे. हे यूट्युबवरुन काढले आहे. पण हा चित्रपट उद्य १४ जाने. २०२२ रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होतोय असा उल्लेख आहे. यात अनेक आक्षेपार्ह गोष्टी ठळकपणे आढळतात. हा ट्रेलर ‘एज रिस्ट्रिक्टेड’ नसल्याने सर्व वयाच्या लोकांकरिता उपलब्ध होती. यात अल्पवयीन मुलांना लैंगिकसंबंधांमधे गुंतलेले, टोकाची हिंसा करतांना, अर्वाच्य शिव्या व अश्लिल भाषेचा वापर करतांना आणि जवळच्या महिला नातेवाइकाबरोबर अनैतिक संबंध ठेवतांना दाखवले आहे.

मुंबईतील गिरणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांचे अतिशय विकृत चित्रीकरण करण्यात आले आहे. या ट्रेलरमधे सेन्सॉर बोर्डाचे कुठले सर्टिफिकेट मिळाले आहे याची स्पष्टता नाही. अशा प्रकारे भारताच्या पोक्सो (POCSO) सहीत अन्य कायद्यांचे उल्लंघन तर आहेच पण त्याचबरोबर नैतिकतेच्याही सर्व मर्यादा ओलांडणारे आहे, असे तक्रारपत्रात नमूद करण्यात आले आहे.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार्‍या या भारतीय स्त्री शक्ती या संघटनेने गुन्हा नोंदविण्याबाबत तक्रार केली असून ही तक्रार सेन्सॉर बोर्ड, महिला व बाल कल्याण मंत्रालय, बाल हक्क आयोग, राष्ट्रीय महिला आयोग आणि माहिती व प्रसारण मंत्रालय यांच्याकडे पाठवल्या आहेत. त्याचबरोबर सायबर सेल व पोलिसांनाही तक्रार देण्यात आली. समाजातील महिला व मुलांच्या प्रश्नांवर काम करणार्‍या विविध संघटनांनीही या ट्रेलरला तीव्र निषेध नोंदवला आहे.

बाल हक्क आयोगाने भारतीय स्त्री शक्तीच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन सेन्सॉर बोर्ड, महाराष्ट्र पोलिस व ग्रिव्हन्स सेल यांना नोटीस पाठवली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या रेखा शर्मा यांनीही याची दखल घेतली. सायबर सेलमधे दखल घेतली गेल्याने त्यांच्याही कार्यवाहीला सुरुवात झालेली आहे.

नागरिकांमधून ह्या ट्रेलर विरोधात संताप व निषेध व्यक्त होत असून दुर्गा वाहिनी, अ.भा.वि.प., विद्या भारती, सहकार भारती, चेंबूर विद्या समिती, संस्कार भारती, विविध संघटना ह्या चित्रीकरणाचा विरोध करत आहेत.

Ban Mahesh Manjrekar film waran bhat loncha non nay koncha

महत्त्वाच्या बातम्या