Gang Rape Case : राजस्थानात ‘निर्भया’सारखे क्रौर्य, पीडितेची प्रकृती स्थिर, राजकारण तापले

राजस्थानच्या अलवरमध्ये मतिमंद अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर राजकारणही तापले आहे. या मुद्द्यावर भाजपने राज्यातील काँग्रेस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने जेके हॉस्पिटलमध्ये जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली.Gang Rape Case Cruelty like Nirbhaya in Rajasthan, victim’s condition stable, politics heats up


वृत्तसंस्था

जयपूर : राजस्थानच्या अलवरमध्ये मतिमंद अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर राजकारणही तापले आहे. या मुद्द्यावर भाजपने राज्यातील काँग्रेस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने जेके हॉस्पिटलमध्ये जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये राजस्थान नंबर 1 बनले आहे, असा आरोप भाजपने केला आहे. मूकबधिर सरकार कुंभकर्णी झोपेत आहे. सरकारने आता तरी जागे होण्याची गरज आहे. राजस्थानमध्ये यापूर्वीही अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. सरकारने यावर लवकरात लवकर कारवाई करून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, असे भाजपने म्हटले आहे.काय घडले?

अलवरमध्ये मूकबधिर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपींनी निर्भयाला रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकून दिले होते. पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला जयपूरला रेफर करण्यात आले. अनेक डॉक्टरांच्या पथकाने पीडितेवर शस्त्रक्रिया केली असून, प्रकृती काहीशी स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

अलवरमध्ये रात्री 8 वाजता शिवाजी पार्क पोलीस स्टेशन हद्दीतील तिजारा गेट कल्व्हर्टवर पीडिता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी रक्ताने माखलेल्या अवस्थेत वेदनांनी ओरडत होते. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली

आणि मुलीला रुग्णालयात दाखल केले पण तिची प्रकृती खालावल्याने तिला जयपूरला रेफर करण्यात आले. पीडित मालाखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावातील रहिवासी आहे. ती तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती आणि मंगळवारी सायंकाळपासून बेपत्ता होती.

अद्याप अटक नाही

या मुलीचे आधी अपहरण करण्यात आले आणि तिच्यावर बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिला रस्त्यावर फेकून पलायन केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच एसपी तेजस्वी गौतम, जिल्हाधिकारी नानुमल पहाडिया, एएसपी सरिता सिंह, एडीएम सुनीता पंकज आणि इतर अधिकारीही रुग्णालयात पोहोचले

आणि त्यांनी संपूर्ण माहिती घेतली. एसपी तेजस्विनी गौतम यांनी सांगितले की, आरोपींच्या शोधासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. एफएसएल टीम आणि श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

Gang Rape Case Cruelty like Nirbhaya in Rajasthan, victim’s condition stable, politics heats up

महत्त्वाच्या बातम्या