वृत्तसंस्था
चंडीगढ : चंडीगढ नगर निगम निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असून विद्यमान महापौर रविकांत शर्मा हे देखील पराभूत झाले आहेत. परंतु नगर निगम मध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नसून पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आम आदमी पार्टीला मोठे यश मिळत आत्तापर्यंत 14 जागांवर विजय मिळवता आला आहे. BJP loses in Chandigarh Nikam elections; You are at No. 1, but the result is hung !!
एकूण 35 वाॅर्ङांमध्ये ही निवडणूक झाली. त्यामुळे आम आदमी पार्टीला 14 भाजपला 11 काँग्रेसला 8 आणि अकाली जगाला 1 जागा मिळाली आहे अद्याप 19 जागांचे निकाल यायचे आहेत.
शेतकरी आंदोलनाच्या यशस्वी पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकीत भाजपचा तेथे पराभव झाला असला तरी कोणत्याही एकाच एकाच पक्षाला बहुमत मिळवण्यात मात्र अपयश आले आहे. पंजाब विधानसभेची निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आली असताना काँग्रेस, भाजप, अकाली दल आम आदमी पार्टी या सर्वच पक्षांनी चंदीगढ शहर निवडणुकीकडे लिटमस टेस्ट म्हणून पाहिले होते. येथे भरपूर जोर लावला होता.
शेतकरी आंदोलनात पंजाबी शेतकऱ्यांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेतात येथे भाजपचा दारुण पराभव होणार अशा अटकळी बांधल्या गेल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात भाजपला येथे दणका बसला असला तरी भाजप सध्या दोन नंबरच्या स्थानावर कायम आहे. भाजपा येथे सत्ताधारी पार्टी होती. परंतु या स्थानाला धक्का पासून आम आदमी पार्टीने भाजपवर मात केली आहे. परंतु पूर्ण बहुमत मिळवण्याचे संख्याबळ आम आदमी पार्टीला त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत मिळालेले दिसत नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App