Salman Khan Birthday: ‘एकदा नाही तर तीनदा चावला विषारी साप’ ! स्वतः सलमानने सांगितला परवाचा किस्सा …


विशेष प्रतिनिधी

पनवेल : सलमान खान आज आपला 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी सलमानला साप चावला मात्र आता सलमान पुर्णतः बरा झाला आहे. तात्काळ उपचार घेतल्यानंतर सलमानला रुग्णालयातून सहा तासानंतर घरी सोडण्यात आलं होतं. या सगळ्या प्रकारानंतर आज सलमानने मीडियाशी संवादही साधला आणि आपल्या फार्म हाऊसवर सापाने नेमका कसं दंश केला आणि तिथे नेमकं काय घडलं हे देखील सांगितलं. Salman Khan Birthday: ‘Poisonous snake bites not once but thrice’! Salman himself told the story of Parvacha …

‘साप एकदा नव्हे तर तीनदा चावला..’

सलमानने फार्म हाऊसवरील घटनेबाबत बोलताना सांगितले की, ‘माझ्या फार्महाऊसमध्ये साप आला होता. मी त्याला काठीच्या साहाय्याने बाहेर काढत होतो. पण तो हळूहळू माझ्या हाताच्या दिशेने पुढे सरकला. मग मी त्याला बाहेर काढण्यासाठी हाताने पकडले. पण त्यावेळी त्याने मला तीनदा चावा घेतला. हा एक प्रकारचा विषारी साप होता. साप चावल्यानंतर मला सुमारे 6 तास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण मी आता ठीक आहे.’

आज सलमान खानचा वाढदिवस आहे. सलमान केवळ वाढदिवस साजरा करण्यासाठी फार्महाऊसवर पोहोचला होता. जिथे त्याला सर्पदंश झाला. खरंतर, कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे सलमानने त्याचा वाढदिवस कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसोबत फार्महाऊसवर साजरा करण्याचा निर्णय घेतला होता पण वाढदिवसाच्या एक दिवस आधी सलमानसोबत हा भीषण प्रकार घडला.

Salman Khan Birthday : ‘Poisonous snake bites not once but thrice’!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था