विशेष प्रतिनिधी
मुंबई : हायड्रोजनच्या निर्मितीसाठी प्रदूषणकारी प्रक्रियेऐवजी पाण्याच्या विघटनातून हायड्रोजन मिळविण्यासाठी भारत पेट्रोलियमने (बीपीसीए) भाभा अणुसंशोधन केंद्राबरोबर (बीएआरसी) सहकार्य केले आहे. हायड्रोजन निर्मितीच्या प्रक्रियेत हवेत कार्बन डायऑक्साईड सोडला जातो. त्यामुळे प्रदुषण होते. हे टाळण्यासाठी पाण्याच्या विघटनातून हायड्रोजन निर्माण करण्यासाठी अल्कलाईन इलेक्ट्रोलायझर तंत्रज्ञान वापरण्याबाबत बीपीसीएल व बीएआरसी यांच्यात हे सहकार्य होईल. अशी माहिती बीपीसीएलने दिली. Will get hydrogen from water
सध्या तेल शुद्धीकरण कारखान्यांमध्ये नैसर्गिक वायूपासून हायड्रोजन तयार करण्यात येतो, मात्र या प्रक्रियेतून प्रदूषणकारी कार्बन डायऑक्साईड हवेत सोडला जातो. हे टाळण्यासाठी अवाढव्य इलेक्ट्रोलायझर प्लांट बसवले जातील. पर्यावरणाच्या रक्षणासाठी हे पाऊल उचलले आहे.
इलेक्ट्रोलायझर प्लांटमधून पाण्याचे विघटन करून हायड्रोजनची निर्मिती होते, सध्या हे इलेक्ट्रोलायझर प्लांट परदेशातून आयात केले जातात. आता त्याचीच बांधणी बीएआरसीमार्फत होईल व त्याचा वापर स्वच्छ हायड्रोजन निर्मितीसाठी केला जाईल. अशा प्रकारचा हा सरकारी आस्थापनांमधील पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे स्वच्छ उर्जेचा वापर आणि प्रदूषण कमी करण्याचे ध्येय गाठता येईल अशी खात्री व्यक्त करण्यात येत आहे. तेलशुद्धीकरण कारखान्यांमध्ये कच्च्या तेलापासून पेट्रोल, डिझेल व अन्य रसायने तयार करण्याच्या डी सल्फरायझेशन प्रक्रियेत हायड्रोजनचा वापर होतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App