विशेष प्रतिनिधी
राजस्थान : राजस्थान मंत्रिमंडळात नुकताच बदल करण्यात आला आहे. तर राज्याचे नवे ग्रामीण विकास मंत्री बनलेले राजेंद्र गूढा प्रथमच आपल्या विधानसभा क्षेत्रास भेट देण्यासाठी गेले होते. त्यांच्या ह्या भेटी दरम्यान स्थानिक लोकांनी खाचखळगे असलेल्या रस्त्याची तक्रार मंत्र्यांकडे केली. तेव्हा माननीय ग्रामीण विकास मंत्री राजेंद्र गूढा यांनी PWD विभागास अभिनेत्री कॅटरिना कैफच्या गालांसारखे रस्ते बनवण्याची सूचना दिली आहे.
Actress Hema Malini has aged, make roads like Katrina Kaif’s cheeks; Newly elected Rajasthan Rural Development Minister Rajendra Gudha
तर झाले असे की लोकांनी जेव्हा खराब रस्त्यांची तक्रार केली तेव्हा त्यांनी ऑफिसर एन के जोशी यांना सूचना देताना म्हटले की रस्ते हे हेमा मालिनी यांच्या गाला सारखे बनवले पाहिजेत. पण जेव्हा त्यांना स्वतःला लक्षात आले की अभिनेत्री हेमा मालिनी ह्या वृद्ध झालेल्या आहेत तेव्हा त्यांनी तेथे उपस्थित लोकांना प्रश्न केला की, आजकाल कोणती अभिनेत्री प्रसिद्ध आहे? लोकांनी अभिनेत्री कॅटरिना कैफ हिचे नाव घेतले. तेव्हा त्यांनी जोशी यांना कॅटरिना कैफच्या गालांसारखे रस्ते बनवा अशी सूचना केली.
Sooryavanshi Movie : ये दिवाली अक्षय वाली ! अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ दिवाळीत करणार धमाका ; 5 नोव्हेंबरला होणार रिलीज!
राजेंद्र गूढा हे BSP मधून नुकताच कांग्रेस पक्षात आलेले आहेत. नवं निर्वाचित गहलोत मंत्रिमंडळात त्यांना ग्रामीण विकास मंत्री हे पद देण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App