यमुना एक्स्प्रेस वेला अटलबिहारी वाजपेयींचे नाव दिले जाण्याची शक्यता, नामांतर योगी सरकारच्या विचाराधीन

Yamuna Expressway can be named after Atal Bihari Vajpayee By Yogi Govt UP

Yamuna Expressway : उत्तर प्रदेशचे योगी सरकार यमुना एक्सप्रेस वेचे नाव बदलण्याचा विचार करत आहे. दोन दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जेवार विमानतळाचे भूमिपूजन करण्यासाठी ग्रेटर नोएडा येथे येत आहेत. दरम्यान, यमुना एक्स्प्रेस वेला भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणा केली जाऊ शकते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भारताच्या महान आणि लोकप्रिय नेत्याला योग्य सन्मान मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. Yamuna Expressway can be named after Atal Bihari Vajpayee By Yogi Govt UP


वृत्तसंस्था

नोएडा : उत्तर प्रदेशचे योगी सरकार यमुना एक्सप्रेस वेचे नाव बदलण्याचा विचार करत आहे. दोन दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जेवार विमानतळाचे भूमिपूजन करण्यासाठी ग्रेटर नोएडा येथे येत आहेत. दरम्यान, यमुना एक्स्प्रेस वेला भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणा केली जाऊ शकते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भारताच्या महान आणि लोकप्रिय नेत्याला योग्य सन्मान मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

25 नोव्हेंबरला पीएम मोदींच्या हस्ते विमानतळाचे भूमिपूजन

25 नोव्हेंबर रोजी जेवर विमानतळाचे भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान मोदी येणार आहेत. यादरम्यान ते एका सभेलाही संबोधित करणार आहेत. यादरम्यान यमुना एक्सप्रेस वेचे नाव बदलण्याची घोषणा केली जाऊ शकते. यमुना एक्स्प्रेस वेच्या नामांतरामुळे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्याचा प्रयत्न असेल, याशिवाय ब्राह्मण मतदारांना आकर्षित करण्यातही फायदा होणार आहे.

सध्या विमानतळाच्या कुंपणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विमानतळाच्या उभारणीसाठी 1334 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून विमानतळाचे बांधकाम 2023-2024 पर्यंत पूर्ण होईल. या कालावधीत, ते जनतेला समर्पित केले जाईल.

विमानतळावर पाच धावपट्ट्या

2024 पर्यंत नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पहिली हवाईपट्टी तयार होईल. यामुळे तेव्हाच पहिले उड्डाण होऊ शकेल. येथे आधी दोन एअरस्ट्रीप्स तयार होतील, त्यानंतर 5 एअरस्ट्रीप्स नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये असतील, जे एक ऐतिहासिक पाऊल असेल. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासंदर्भात नो पार्किंग झोन तयार करण्यात आला आहे. यासोबतच बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहे तयार करण्यात आली आहेत.

Yamuna Expressway can be named after Atal Bihari Vajpayee By Yogi Govt UP

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात