गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत सह्याद्री अतिथीगृहावर दाखल ; बैठकीतून कोणता मार्ग निघणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष


कालच्या बैठकीत शरद पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी काही महत्वाच्या सूचनाही पवारांनी दिल्या आहेत.Gopichand Padalkar and Sadabhau Khot admitted to Sahyadri Guest House; The attention of the entire state is focused on the way out of the meeting


विशेष प्रतिनिधी

मुंबई : गेल्या वीस दिवसांपासून सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अद्यापही सुरुच आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी १४ दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत.दरम्यान यावर तोडगा काढण्यासाठी काल अनिल परब यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वरळीत बैठक घेतली.ही बैठक तब्बल साडे चार तास चालली होती.दरम्यान आज चर्चेसाठी निमंत्रण आल्यानंतर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासह सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत.यावेळी आता कुठला मार्ग या बैठकीतून निघेल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

कालच्या बैठकीत शरद पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी काही महत्वाच्या सूचनाही पवारांनी दिल्या आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी दिलेल्या सूचनांवर आजच्या बैठकीत चर्चा होईल. पवारांच्या सूचना पडळकर, खोत यांच्यासह एसची कर्मचाऱ्यांना मान्य होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Gopichand Padalkar and Sadabhau Khot admitted to Sahyadri Guest House; The attention of the entire state is focused on the way out of the meeting

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”