हेमा मालिनींच्या उमेदवारी पुढे शस्त्रे टाकत बॉक्सर विजेंदर मथुरेच्या बाजारातून थेट भाजपच्या गोटात!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भाजप खासदार हेमामालिनी यांना मथुरा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आव्हान उभे करण्याची भाषा करणारा बॉक्सर विजेंदर सिंग मथुरेच्या बाजारातून उठून थेट भाजपच्या गोटात दाखल झाला. हे कधी आणि कसे घडले??, याविषयी काँग्रेसच्या नेत्यांचे डोके भिरभिरले.Hema Malini’s candidacy is throwing weapons from Boxer Vijender Mathura’s market directly into BJP’s fold!!



बॉक्सर विजेंदर सिंग याला मथुरा लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्याची तयारी काँग्रेसने चालवली होती. उत्तर प्रदेशातील हाय प्रोफाईल मथुरा मतदारसंघात तितक्याच हाय प्रोफाईल खासदार हेमामालिनी यांच्यासमोर ग्लॅमरस उमेदवार पाहिजे म्हणून काँग्रेसने ऑलिंपिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंग यांची निवड केली होती. गेले चार-पाच दिवस त्याच्याच उमेदवारीची चर्चा देशभराच्या राजकीय वर्तुळात सुरू होती.

पण प्रत्यक्षात बॉक्सर विजेंदर सिंगने आज काँग्रेसला मथुरेतला “कात्रज घाट” दाखवत मथुरेच्या बाजारातून थेट भाजपच्या गोटात प्रवेश केला. भाजपच्या केंद्रीय कार्यालयात पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी त्याचे स्वागत केले. ही सगळी घडामोडी घडत असताना काँग्रेस नेत्यांना विजेंदर सिंगच्या मनात नेमके काय चालू आहे, याची साधी भनक देखील लागू शकली नाही.

देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळावी म्हणून आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे विजेंदर सिंगने सांगितले.

Hema Malini’s candidacy is throwing weapons from Boxer Vijender Mathura’s market directly into BJP’s fold!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात