विज्ञान सांगते : प्रेमातील नकार आणि वाढणारी ओढ

एका पाहणीनुसार कॉलेजमध्ये जाणाऱ्या ६६ टक्के मुला-मुलींत नातेसंबंध जुळतात आणि तुटतातही. त्यातील ५० टक्के जणांत नाते पुन्हा जोडले जाते. नात्यांत असलेल्या ३३ टक्के व लग्न झालेल्या ५० टक्के जोडप्यांत ब्रेकअपनंतर पॅचअप झाल्याचे दिसून येते. जीवनात अनेकांचा प्रेमभंग होतो. त्यानंतरही काही जोडपी पुन्हा प्रेमाने जवळ येतात. काही जण ब्रेकअपनंतरही प्रियकर अथवा प्रेयसीला पुन्हा जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतात. तर काही जण सर्व विसरुन नव्याने सुरवात करतात. असे का घडते, याचा शोध संशोधकांनी घेतला आहे.Rejection of love and growing longing

किन्से इन्स्टिट्यूटमधील मानसशास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले. त्यांनी ब्रेकअप झालेल्यांच्या मेंदूचे एफ-एमआरआय विश्लेषण केले. त्यांच्या निष्कर्षांनुसार, ब्रेकअप झालेली व्यक्ती निषेधाच्या काळातून जाते. या दरम्यान ती सोडून गेलेल्या व्यक्तीचा ध्यासच घेते आणि त्याला पुन्हा जिंकण्यासाठी प्रयत्न करू लागते.

या त्यांना माजी प्रियकर, प्रेयसीची छायाचित्रे दाखवल्यावर त्यांच्या मेंदूतील यश आणि अपयश, तसेच भावना नियंत्रित करणारे भाग उत्तेजित झाले. त्याचबरोबर ओढीची भावनाही जागृत झाली.त्यावरुन नकार मिळाल्यानंतर व्यक्ती प्रेम करणे सोडत नाही, उलट तुम्ही त्या व्यक्तीवर अधिकच प्रेम करू लागता. नकार मिळालेल्या व्यक्तीच्या शरीरातील डोमामाइन व नोरेपिनीफ्रिन या न्यूरोट्रान्समीटरची पातळीही खूप वाढली.

यातून त्या व्यक्तीवरील ताण आणि कोणाकडून मदत मिळावी ही भावना वाढते. याला फ्रस्ट्रेशन अॅट्रॅक्शन म्हणतात. मेंदूतील रासायनिक अभिक्रियांप्रमाणे मनुष्याच्या स्वभाव व वागणुकीचाही नात्यांवर परिणाम दिसतो. एखाद्याने ब्रेकअपनंतर नवीन पार्टनर शोधल्यास त्याच्या पहिल्या जोडीदाराविषयीच्या भावना वेगाने पुसल्या जातात व पुन्हा एकत्र येण्याची शक्यताही मावळते.

Rejection of love and growing longing