बैलगाडा शर्यत रोखण्यासाठी पोलिसांनी मैदान खोदले; पण कुठे “हे” खोदणे आणि “ते” खोदणे…!! ही बाळासाहेबांच्या महाराष्ट्राची प्रगती की अधोगती…??


विनायक ढेरे

नाशिक : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत 20 ऑगस्टला आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीला विरोध करण्यासाठी पोलिसांनी थेट बैलगाडा शर्यतीचे मैदानच खोदून काढले. सांगली जिल्ह्यातील झरे गावात त्यांनी ही कारवाई केली. Police dug a field to stop the bullock cart race

गोपीचंद पडळकर यांनी २०/तारखेला बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. बैलगाडी शर्यतीवर सुप्रीम कोर्टाने बंदी लादल्याचे कारण देत ही कारवाई पोलिसांनी केली आहे. परंतु त्याला स्थानिक नागरिकांचा तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांचा कडाडून विरोध होतो आहे. असाच विरोध पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. या दोन्ही आजी – माजी खासदारांचा बैलगाडा शर्यतीसाठी आग्रह आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी सांगली जिल्ह्यातल्या झरे गावात बैलगाडा शर्यतीचे मैदानच जेसीबी लावून खोदून काढले आहे.

– बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांची आठवण

महाराष्ट्र पोलिसांच्या या कारवाईमुळे आठवण झाली ती, शिवसैनिकांच्या जुन्या पराक्रमाची…!! 1991 मध्ये शिवसेनेतले बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक शिशिर शिंदे यांनी बाळासाहेबांनी आदेश देताच वानखेडे स्टेडियममध्ये घुसून तिथले पीच खणून काढले होते. पाकिस्तानला भारतात येऊ द्यायचे नाही आणि त्यांची क्रिकेट मॅच होऊ द्यायची नाही हा बाळासाहेबांचा आदेश होता. तो शिशिर शिंदे आणि अन्य शिवसैनिकांनी बेधडक पाळला. त्यांनी खेळपट्टी खणून काढली. त्यामुळे तो सामना रद्द करावा लागला. त्यावेळी महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने शिशिर शिंदे आणि शिवसैनिकांवर खटले चालवले. पण बाळासाहेब आणि त्यांचे शिवसैनिक डरले नाहीत.



इतकेच नाही तर 1999 मध्ये कारगिल युद्धानंतर पाकिस्तान टीमने भारत दौरा केला. त्यावेळी देखील बाळासाहेबांचा पाकिस्तान दौऱ्याला प्रचंड विरोध होता. तेव्हा बाळासाहेबांच्या दिल्लीतल्या शिवसैनिकांनी फिरोजशहा कोटला मैदानात घुसून तिथली खेळपट्टी खणून काढली होती. त्यावेळी सामन्याला विलंब झाला होता. परंतु त्याच सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याने पाकिस्तानच्या 10 विकेट काढून भारताला हा सामना जिंकून दिला होता. या पराक्रमाचे बाळासाहेबांनी दिलदारपणे कौतुक केले होते. पाकिस्तानला कट्टर विरोध असल्यामुळे बाळासाहेबांनी शिवसैनिकांना क्रिकेट सामने रोखण्याचे आदेश दिले होते.

आज महाराष्ट्राचे पोलीस बाळासाहेबांचे पुत्र मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहेत. त्यांनी सांगलीतल्या झरे गावात बैलगाडा शर्यत होऊ नये म्हणून मैदान खणून काढले आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांनी दिलेल्या आदेशाची आणि त्याची बेधडक अंमलबजावणी करणार्‍या कट्टर शिवसैनिकांची आठवण झाली एवढेच…!!

Police dug a field to stop the bullock cart race

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात