शब्दबंदी : दोन राज्ये दोन निर्णय…!! एक राजकीय, दुसरा धर्मभावनेतून…!!


हरियाणा सरकारची “गोरख धंदा” या शब्दावर बंदी; नाथ परंपरेच्या भावना दुखावतात म्हणून निर्णय


मध्य प्रदेश मध्ये पप्पू, मिस्टर बंटाधार शब्दांवर बंदी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दोन राज्ये, दोन निर्णय… शब्दबंदीचे…!! एक राजकीय, दुसरा धर्मभावनेतून…!! हरियाणातील मनोहर लाल खट्टर यांच्या सरकारने गोरख धंदा या शब्दावर बंदी आणली आहे. नाथ परंपरेतील गुरु गोरक्षनाथ यांना गोरखनाथ म्हटले जाते. त्यामुळे गोरख शब्द नाथ परंपरेत पवित्र मानला जातो. अशा स्थितीत वाईट धंदा किंवा गुन्हेगारी स्वरूपाच्या धंद्याला “गोरख धंदा” म्हणे योग्य नाही म्हणून हरियाणा सरकारने या शब्दावर बंदी आणल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी पत्रकारांना दिली आहे. Ban on words; in Haryana and Madhya Pradesh

गोरख धंदा शब्द वापरल्याने नाथ परंपरा मानणाऱ्या समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. तशा भावना दुखावू नयेत, या हेतूने सरकारने हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री खट्टर यांनी स्पष्ट केले.



मध्यप्रदेशात विधिमंडळात काही शब्दांना बंदी

मध्यप्रदेश विधानसभेने नुकतीच एक पुस्तिका प्रकाशित करून काही विशिष्ट शब्दांना विधिमंडळ कामकाजातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पप्पू, चोर, भ्रष्टाचारी, धोकेबाज मिस्टर बंटाधार आदी शब्दांचा समावेश आहे. पप्पू हा शब्द राहुल गांधींना चिडवण्यासाठी वापरला जातो, तर मिस्टर बंटाधार हा शब्द माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांच्यासाठी भाजपचे नेते वापरत असत. दिग्विजय सिंग यांच्या काळात पदांची आणि महामंडळांची खैरात काँग्रेस कार्यकर्त्यांवर करण्यात आली होती याबद्दल हा शब्द भाजपचे नेते दिग्विजय सिंग यांच्यावर आरोप करताना वापरत होते. हे सर्व शब्द आता विधिमंडळ कामकाजात अधिकृतरीत्या वापरता येणार नाहीत तसेच आधी विधिमंडळ कामकाजात हे शब्द असतील तर ते काढून टाकण्यात येतील असे सांगण्यात आले आहे. मध्य प्रदेशातला हा निर्णय राजकीय आहे.

मात्र त्यानंतर हरियाणा सरकारने गोरख धंदा हा शब्द आपल्या सरकारी कारवाईतून वगळण्याचा निर्णय घेणे तसेच सार्वजनिक ठिकाणी गोरख धंदा हा शब्द वापरण्यावर बंदी घालणे हा निर्णय जनतेच्या धार्मिक भावना दुखावू नयेत म्हणून घेण्यात आला आहे.

Ban on words ; in Haryana and Madhya Pradesh

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात