विशेष प्रतिनिधी
सोलापूर : आपल्या जुन्याच समर्थकांना गळाला लावण्याच्या शरद पवारांच्या माढा मोहिमेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माढावर नव्याने स्वारी केली. माढा मतदार संघाची राजकीय फेरमांडणी करून फडणवीसांनी मोदींच्या सभेची कसून पूर्वतयारी चालवली आहे.Fadnavis riding after Pawar’s Madha campaign
माढा मतदारसंघात आपले जुने समर्थक विजयसिंह मोहिते पाटील यांना गळ्याला लावून त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गळ्यात पवारांनी माढाची उमेदवारी घातली. त्यामुळे मराठी माध्यमांमध्ये माढा मध्ये रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढे तगडा उमेदवार उभा राहिल्याचे चित्र निर्माण झाले. पवारांनी भाजपच्या गोटातील उत्तम जानकरांना देखील आपल्या गोटात आणले. माढा मतदारसंघात 4 सभा घेऊन पवारांनी आपला मोहरा पुन्हा बारामतीकडे वळविला. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस माढा मतदारसंघात दाखल झाले. त्यांनी विजयसिंह मोहिते पाटलांच्या घरातले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवल सिंह मोहिते पाटील यांना आपल्या गळाला लावले. इतकेच नाही तर रामराजे निंबाळकर यांची नाराजी दूर करून त्यांनाही आपल्या गोटात टिकवण्यासाठी फडणवीस कामाला लागले आहेत. मोदी हे तो मुमकिन है अशा सूचक शब्दांमध्ये त्यांनी रामराजेंना कसे पटवणार हे सांगून टाकले.
विठ्ठल कारखान्याचे अडचणीत आलेले अध्यक्ष शरद पवार समर्थक अभिजीत पाटील फडणवीस यांची भेट मागण्यासाठी ताटकळत राहिले.
फडणवीस आणि दरम्यानच्या काळात बार्शी सांगोला अकलूज, माढा आणि मोहोळ मध्ये मोठ्या सभा घेतल्या. कार्यकर्त्यांना पूर्ण चार्ज केले. उद्या पंतप्रधान मोदींची सोलापुरातील सभा विक्रमी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मोहिते पाटील तुमच्याबरोबर होते. आज तेच मोहिते पाटील तुमच्यावर टीका करत आहेत. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “प्रत्येक टीकेला आम्ही कृतीमधून उत्तर देतो. शेवटी लोकांना दिसत आहे की, ज्यावेळी शरद पवार यांनी मोहिते पाटलांचे राजकारण जवळजवळ संपुष्टात आणले होते, तेव्हा भाजप मोहिते पाटलांच्या पाठिशी उभे राहिला. त्यामुळे मूवी विजयसिंह मोहिते पाटील शरद पवारांवर पुन्हा गेले हे मोहिते पाटलांच्या घरात सगळ्यांनाच पटलेले नाही. पण त्यावर मला जास्त काही बोलायचं नाही. मोहिते पाटील यांच्या पाठिशी आम्ही उभं राहिलो, आता काय करायचं हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे!!
माढा तालुक्यातील बबनराव शिंदे-तानाजी सावंत हे एकत्रित आले. तसेच फलटणमधील रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर एकत्र येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मोदी है तो मुमकीन है, आमचा प्रयत्न सर्वांना एकत्रित करण्याचाच असतो. विभाजन करणारे लोक आम्ही नाहीत. आता पुढे काय काय होतं ते पाहत राहा, असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App