प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातली आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई करत नांदेडमध्ये मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तब्बल 1 हजार 127 किलो गांजा पकडला आहे.Narcotics Control Bureau’s largest operation in Maharashtra so far
आंध्र प्रदेश – महाराष्ट्रच्या बॉर्डरवर ही कारवाई करण्यात आली आहे. 1 हजार 127 किलो गांजा पकडण्यात यश आल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी प्रसार माध्यमांना दिली आत्तापर्यंत गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करून 5000 किलो पेक्षा जास्त ड्रग्ज पकडण्यात आली आहेत. पण आता महाराष्ट्रात आज मोठी कारवाई झाली आहे.
#UPDATE | NCB revises and corrects the amount of Ganja and the location in connection with the seizure this morning. A total of 1,127 kgs of Ganja was seized in Nanded earlier this morning and not 1,500 kgs in Jalgaon as reported earlier. — ANI (@ANI) November 15, 2021
#UPDATE | NCB revises and corrects the amount of Ganja and the location in connection with the seizure this morning. A total of 1,127 kgs of Ganja was seized in Nanded earlier this morning and not 1,500 kgs in Jalgaon as reported earlier.
— ANI (@ANI) November 15, 2021
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विशेष पथक करतेय ६ गुन्ह्यांचा तपास; समीर खानच्या प्रकरणाचाही समावेश
या कारवाईदरम्यान, दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे . एक अवजड वाहन आणि कारसुद्धा ताब्यात घेण्यात आल्याचे वानखेडेंनी सांगितले आहे. अजूनही यासंदर्भात कारवाई चालू असून, एवढ्या जास्त प्रमाणातील गांजा सप्लायर आणि कन्सुमर्सचा शोध घेण्यात येत आहे. 1 हजार 127 किलो गांजा पकडणे, ही मुंबई नार्कोटिक्स ब्यूरोची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.
लोखंडाची वाहतूक करत असलेल्या ट्रकमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा आणण्यात आला होता. आंध्र प्रदेशातून हा ट्रक महाराष्ट्राच्या दिशेने येत असताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा घालून गांजा पकडला. महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये हा गांजा पुरवला जाणार होता. ही कारवाई अजून चालू असून, या कारवाई संदर्भातील अधिक माहिती हाती आल्यावर अपडेट करू, असे समीर वानखेडेंनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App