नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विशेष पथक करतेय ६ गुन्ह्यांचा तपास; समीर खानच्या प्रकरणाचाही समावेश


प्रतिनिधी

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उपमहासंचालक आणि विजिलन्स टीमचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंह दिल्लीहून मुंबईत दाखल झाले. क्रूज ड्रग्ज प्रकरणात ज्ञानेश्वर सिंह यांच्यासह ६ अधिकारी चौकशी करत आहेत. या प्रकरणात मुख्य साक्षीदार असलेले किरण गोसावी आणि गोसावीचा सुरक्षा रक्षक प्रभाकर साईलची चौकशी सुरू आहे.Special team of Bureau of Narcotics Control investigates 6 crimes; Including the case of Sameer Khan

एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह आणि विशेष पथकाने क्रूझ ड्रग्स प्रकरणात आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनस, लोअर परळ फिनिक्स मॉल आणि ताडदेव मधील इंडियाना बार या ठिकाणाला सोमवारी भेटी देऊन या जागेची पाहणी केली आहे. या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याची देखील पहाणी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या चौकशीदरम्यान, एकूण ६ गुन्ह्याचा तपास हे विशेष पथक करत आहे. यात समीर खान प्रकरणही आहे.



प्रभाकर साईल याचा जबाब उद्या, मंगळवारी नोंदवण्यात येणार असून साईलला उद्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कार्यालयात बोलवण्यात आले असल्याची माहिती ज्ञानेश्वर सिंग यांनी दिली. तसेच या क्रुज प्रकरणाशी संबंधिताना समन्स बजावून त्यांचे देखील पुन्हा जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे उपमहासंचालक सिंग यांनी म्हटले आहे.

६ गुन्ह्यांचा तपास सुरू

किरण गोसावी आणि पूजा ददलानी यांच्यात लोअर परळ येथील फिनिक्स मॉल जवळ मर्सडीझ या आलिशान मोटारीत १८ कोटींची डील झाली होती, असा आरोप साईल या साक्षीदाराने केला आहे. यासाठी तसेच इंडियाना बार येथे ५० लाख रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली होती, असे साईल याने म्हटले होते त्या अनुषंगाने या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एसआयटी क्रुज ड्रग्स, समीर खान ड्रग्स प्रकरण, डोंगरी चिंकू , अरमान कोहली आणि जोगेश्वरी येथील दोन असे एकूण ६ गुन्ह्यांचा तपास करत आहे. विशेष पथकातील अधिकारी हे दिल्ली येथून आले असून हा तपास निःपक्षपणे करण्यात येणार असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.

Special team of Bureau of Narcotics Control investigates 6 crimes; Including the case of Sameer Khan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात