वृत्तसंस्था
मुंबई : एटीएमच्या माध्यमातून कुठेही आणि कधीही आणि २४ तास औषधे उपलब्ध होणार आहेत. देशातील प्रत्येक ब्लॉकमध्ये औषधांची ही मशीन बसवण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे.Medicines will be available from ATMs; To install machines in 6,000 blocks across the country; Convenience in remote areas
देशातल्या सहा हजार ब्लॉकमध्ये औषधांचं मशीन बसवण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची चिठ्ठी या मशीनमध्ये टाकल्यानंतर औषधे तातडीने उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटर आणि आंध्र प्रदेशमधील ATMZ या संस्थेमध्ये याचा करार झाला आहे.
केंद्र सरकारची अयूर संजिवनी केंद्र सुरु आहेत. तेथे ही औषधांची एटीएम बसवण्याच्या निर्णय घेतला आहे. गर्भधारणा, कोरोना तपासणी, ऑपरेशन संबंधी औषधे आणि इतर अनेक वैद्यकीय उपकरणं आणि इतर प्रकारची औषधे या एटीएममधून मिळणार आहेत. ग्रामीण उद्योजकांना पुढील महिन्यापासून याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या एटीएममध्ये जेनेरिक औषधं ठेवण्यात येणार आहेत. या एटीएमना ई-कॉमर्स कंपन्या औषधांचा पुरवठा करणार आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना डोळ्यासमोर ठेऊन ती सुरु करण्यात येत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App